Ashadhi Wari 2026 Sant Tukaram Maharaj Palkhi : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत मोठे बदल! जाणून घ्या पर्यायी रस्ते

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 8 जुलैला श्री क्षेत्र आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. दरम्यान श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त 11 ते 19 जुलैदरम्यान वाहतुकीत बदल करण्यात आले.

Ashadhi Wari 2026 Sant Tukaram Maharaj Palkhi : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत मोठे बदल! जाणून घ्या पर्यायी रस्ते

आषाढी वारीसाठी जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याची संस्थानाने जय्यत तयारी केली आहे. श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 8 जुलैला श्री क्षेत्र आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. दरम्यान श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त 11 ते 19 जुलैदरम्यान वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.

पालखी मार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी काही ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पुणे–सोलापूर महामार्गावरील अनेक टप्प्यांवर वाहतूक बंद ठेवून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. तसेच पालखी मार्गावरील बदल लक्षात घेऊन नागरिकांनी पुढे दिलेल्या मार्गांचा वापर करून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यांनी जारी केले आहेत.

हेही वाचा- Jalgaon fire News : आगीचे मोठ-मोठे लोट, सर्वत्र आगीचा विळखा…, अमळनेरमध्ये अग्नितांडव! संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग

वाहतुकीत 'हे' बदल, पर्यायी मार्ग कोणते? 

12 जुलै: लोणीकाळभोर–यवत दरम्यान पुणे–सोलापूर आणि सोलापूर–पुणे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार.
13 जुलै: यवत–वरवंड टप्प्यात पुणे–सोलापूर वाहतूक हडपसर–मगरपट्टा–केसनंद–वाघोली–राहू–पारगाव–दौंड–कुरकुंभ मार्गे वळविण्यात येणार.
14 जुलै: वरवंड–उंडवडी मार्गावर वाहतूक बदल; बारामती–पाटस आणि बारामती–दौंड मार्ग पूर्णपणे बंद राहणार.
15 जुलै: उंडवडी–बारामती टप्प्यातही बारामती–पाटस आणि बारामती–दौंड मार्ग बंद, पर्यायी मार्गाने वाहतूक.
17 ते 18 जुलै: सणसर–निमगाव केतकी मार्गावर बारामती–इंदापूर वाहतूक कळंब, बावडा आणि भिगवण मार्गे वळविण्यात येणार.
18 जुलै: निमगाव केतकी–इंदापूर मार्ग पूर्णपणे बंद; वाहने लोणी देवकर–कळंब किंवा भिगवण मार्गे वळविण्यात येणार.
19 जुलै: इंदापूर शहरातील जुना पुणे–सोलापूर रस्ता वाहतुकीसाठी बंद; वाहतूक बायपासमार्गे वळविण्यात येणार.
19 ते 22 जुलै: इंदापूर–अकलूज मार्गावरील वाहतूक काही कालावधीसाठी बंद; इंदापूर–हिंगणगाव–टेंभुर्णी हा पर्यायी मार्ग उपलब्ध.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number