Weather Upadte: अखेर चिंता मिटली! राज्यात पावसाची जोरदार हजेरी; 24 तासात ‘या’ जिल्ह्यांना धो धो पावसाचा अलर्ट

केरळमध्ये येत्या दोन दिवसात मान्सून दाखल होणार असून हवामान विभागाने येत्या काही दिवसांत मुंबईसह कोकणात पावसाळा सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Weather Upadte: अखेर चिंता मिटली! राज्यात पावसाची जोरदार हजेरी; 24 तासात ‘या’ जिल्ह्यांना धो धो पावसाचा अलर्ट

केरळमध्ये येत्या दोन दिवसात मान्सून दाखल होणार असून हवामान विभागाने येत्या काही दिवसांत मुंबईसह कोकणात पावसाळा सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता व्यक्त केली असतानाच राज्यातील अनेक भागांमध्ये पहिल्या पावसाने मान्सूनच्या आगमनाची चाहूल दिली. यावेळी मुंबईसह ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांत वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लावली आहे. वेंगुर्ले तालुक्यासह कुडाळ तालुक्याच्या काही ग्रामीण भागासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागात पावसाच्या सरी बरसल्या आहेत. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज हवामान विभागाचा येलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे, त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या सरीमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. 

हेही वाचा- Harbor Line Expansion: मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट; गोरेगाव ते बोरीवली हार्बर विस्ताराला वेग; पश्चिम रेल्वेकडून पुलांच्या कामासाठी निविदा जाहीर

सोलापूरकरांना अखेर कडक उन्हापासून मोठा दिलासा मिळालाय. गेल्या काही दिवसांपासून 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेल्या तापमानामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले होते. उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच मंगळवारी रात्री सोलापूर शहरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या ढगाळ वातावरणानंतर शहराच्या विविध भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.

विदर्भातील काही जिल्ह्यांत येत्या 24 तासात काही ठिकाणी वादळासह तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तावला आहे. उत्तर प्रदेश पासून विदर्भ होत रायलसीमापर्यंत उंचावर सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि झंजावत तयार झाला आहे. याच्या प्रभावाने येत्या 24 तासात विदर्भातील काही जिल्ह्यात विजा आणि वादळासह तुरळक स्वरूपात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

मात्र या काळात तापमानात चढ-उतार होणार असून उकाड्याचा त्रास कायम राहण्याचा अंदाज आहे. बुधवारी विदर्भाच्या बहुतेक शहरात तापमान वाढ नोंदविण्यात आली असून ब्रह्मपुरीत राज्यात सर्वाधिक 44 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. नागपूर, अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया आणि वर्धा येथे 1 ते 2 अंशाची वाढ होऊन तापमान 41 ते 42 अंशावर गेले असून जिल्ह्यात आज हवामान विभागाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number