Rajgad Trekkers Accident : भयंकर! राजगडला ट्रेकिंगसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाश्यांचा हल्ला; स्थानिकांच्या मदतीने कड्यामध्ये अडकलेली मुलं बचावली

पुण्यातील वेल्हे तालुक्यातील निसर्गरम्य मढेघाट परिसरात ट्रेकिंगचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांवर निसर्गाचा कोप झाल्याचं पहायला मिळालं आहे.

Rajgad Trekkers Accident  : भयंकर! राजगडला ट्रेकिंगसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाश्यांचा हल्ला; स्थानिकांच्या मदतीने कड्यामध्ये अडकलेली मुलं बचावली

सध्या थंडीचे दिवस आहेत, या दिवसांमध्ये बहुतेक शाळा विद्यार्थ्यांना घेऊन सहली काढतात. यावेळी विद्यार्थ्यांना काही गोष्टींच ज्ञान याव तसेच त्यांना निसर्गासंबंधीत गोष्टींची माहिती कळावी यासाठी पर्यावरणाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांची सहल काढली जाते. मात्र पुण्यातील वेल्हे तालुक्यातील निसर्गरम्य मढेघाट परिसरात ट्रेकिंगचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांवर निसर्गाचा कोप झाल्याचं पहायला मिळालं आहे. पुण्यातील एका खासगी साहसी ट्रेकिंग क्लासच्या माध्यमातून 14 ते 17 वयोगटातील 50 हून अधिक विद्यार्थी मढे घाटात गेले होते.

यावेळी त्यांच्यासोबत मार्गदर्शक देखील होते. मढे घाट उतरत असताना आग्या मोहोळाच्या माशा उठल्या आणि त्यांनी थेट विद्यार्थ्यांवर भीषण हल्ला केला. मधमाशांच्या डंखापासून वाचण्यासाठी मढेघाट ते उपंडा असा ट्रेक करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी पळापळ झाली. या सर्व धावपळीत 8 ते 10 विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जखमी झाले असून, इतर 25 विद्यार्थ्यांच्या शरीरावर मधमाशांनी डंख मारला. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना मधमाशांच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सुदैवाने, स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेल्या अफाट धैर्यामुळे आणि तातडीने केलेल्या मदतीमुळे या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number