नाशिकमध्ये महिंद्रा कंपनीच्या मराझो गाडीच लाँचिंग

नाशिकमधील एका शानदार सोहळ्यात महिंद्रा कंपनीच्या मराझो या गाडीच लाँचिंग करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते. XUV 500 आणि KUV100 नंतरही महिंद्राची मराझो ही सर्वात प्रिमियम कार असणार आहे. ‘मराझो’ या शब्दाचा अर्थ बास्क्यू भाषेत शार्क असा होतो. या गाडीचा आगळा वेगळा डॅशबोर्ड, इन्स्टुमेन्ट […]

नाशिकमध्ये महिंद्रा कंपनीच्या मराझो गाडीच लाँचिंग

नाशिकमधील एका शानदार सोहळ्यात महिंद्रा कंपनीच्या मराझो या गाडीच लाँचिंग करण्यात आलं आहे.

या कार्यक्रमाला महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.

XUV 500 आणि KUV100 नंतरही महिंद्राची मराझो ही सर्वात प्रिमियम कार असणार आहे. मराझोया शब्दाचा अर्थ बास्क्यू भाषेत शार्क असा होतो. या गाडीचा आगळा वेगळा डॅशबोर्ड, इन्स्टुमेन्ट क्लस्टर, एसी व्हेन्ट्स आणि सीट आकर्षक आहेत. मात्र सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे छताला असलेले एसी व्हेन्ट्स.

भारतात अशाप्रकारे मध्यभागी एसी व्हेन्ट्स असलेली मराझोही पाहिली गाडी ठरली आहे. डॅशबोर्ड हा सेंट्रलाइज कंन्सोल्स असणारा टी शेपमध्ये आहे. डॅशबोर्डवरच 7 इंचाची इन्फोर्मेशन टच स्क्रीन देण्यात आली असून त्यामध्ये अॅपल कारप्ले आणि अॅण्ड्रॉइड ऑटो असे दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत.

नावाला साजेसे डिझाइन करण्याच्या दृष्टीने या गाडीचे डिझायनिंग करताना त्यामध्ये शार्क ग्रील्स, शार्कच्या शेपटीच्या आकाराचे टेल लाइट्स, शार्क फीन अॅण्टीना असे भन्नाट लुक्स देण्यात आला आहे.

या गाडीमध्ये 1.6 लीटरचे डिझेल इंजिन आहे. या गाडीमध्ये 6 ऑटो गेअर किंवा सहा मॅन्यूअल गेअरबॉक्स आहेत.

महिंद्राच्या या 7 आसनी गाडीचे बेसिक मॉडेल 9 लाख 99 हजार तर टॉप एण्ड मॉडेल 13 लाख 90 हजारांना उपलब्ध असेल.

महिंद्राची मराझो ही गाडी बाजारात रेनॉल्टच्या लॉगी या गाडीशी थेट स्पर्धा करणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number