गेले बरेच दिवस सुरु असलेल्या बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन सर्वत्रच चांगलाच वाद चिघळलेला पाहायला मिळत आहे. याविषयी अनेक नेत्यांनी वेगवेगळी वक्तव्य मांडल्यानंतर आता पुन्हा एकदा बारसू रिफायनरीचा वाद शिगेला पेटणार असल्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. रिफायनरीच्या मुद्द्यावर उद्धव यांना महायुती भिडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
६ मे रोजी उद्धव ठाकरे बारसूत धडकणार आहेत. तर त्याच दिवशी रत्नागिरीत युतीचा समर्थन मोर्चा होणार आहे. बारसू रिफायनरीच्या समर्थनार्थ महायुतीचा हा प्रत्युत्तर मोर्चा असून उद्योग मंत्री उदय सामंत, भाजपाचे माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, भाजपा नेते प्रमोद जठार हे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.
बारसूत उद्धव ठाकरे उतरणार असलेल्या हेलिपॅडपासूनच युतीच्या नेत्यांचा मोर्चा सुरु होणार असून उद्धव गट आणि शिवसेना-भाजप युतीचे कार्यकर्ते आमनेसामने उभे राहणार आहेत. या सगळ्याच्या पार्शवभूमीवर बारसू रिफायनरीचा वाद पेटणार का? रिफायनरीच्या मुद्द्यावर ठाकरेंविरोधात महायुती भिडणार का? यावर आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
काय म्हणाले निलेश राणे?
तूर्तास सगळीकडेच चर्चेत असलेल्या बारसू रिफायनरीच्या प्रकरणाबाबत बोलत असताना माजी खासदार निलेश राणे यांनी बारसूत आंदोलनाच्या आडून हिंसाचार होत असल्याचा आरोप केला आहे.
विनायक राऊतांचा फडणवीसांना सवाल
सर्वत्र जोर धरलेल्या या बारसू रिफायनरीबाबत फडणवीसांचे डोळे बंद का? असा खडा सवाल विनायक राऊतांनी फडणवीसांना केला आहे.