पुण्यात एक धक्कादायक आणि अजब प्रकार समोर आला आहे. अवघ्या 10 बाय 10 च्या छोट्या खोलीत राहणाऱ्या एका सामान्य नागरिकाला चक्क 1 लाख रुपयांचे वीज बिल देण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील डोणजे गावात महावितरणचा अनागोंदी कारभार समोर आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
घरातील वीज वापर नगण्य असताना एवढे प्रचंड बिल कसे आले? हा मीटरचा बिघाड आहे की रीडिंगमधील मोठी चूक? या प्रकारामुळे संबंधित नागरिक मेटाकुटीला आला असून महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहे. दरम्यान एवढा प्रचंड वीज वापर नसतानाही अवाजवी बिल आल्यामुळे त्या नागरिकाला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे वीज मीटरमधील तांत्रिक बिघाड, चुकीचे रीडिंग किंवा बिलिंग प्रक्रियेतील त्रुटी याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्येही चिंता व्यक्त केली जात असून संबंधित विभागाकडून नेमके कारण शोधण्याची मागणी होत आहे.