एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करावे आणि एसटी कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ या मागण्यांसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारले. मात्र आजही एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघाला नाही. राज्य सरकारने काढलेला जीआरमधील तपशील कर्मचारी संघटनांनी अमान्य केला आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी संपाच्य भूमिकेवर ठाम राहणार असल्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे राज्य सरकारने जीआर काढला आहे मात्र सरकारचा हा कागद आंदोलकांना मान्य नसल्याने संपकारी एसटी कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत.
आजही एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यात ठिकठिकाणी संप पुकरला असून एसटी बससेवा बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले सुरू आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाविरोधात राज्य परिवहन महामंडळाकडून उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे.
एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करावे ही एसटी कर्मचारी संघटनांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे राज्यात सुरू असलेल्या एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने निर्णय जारी करण्याचा अध्यादेश न्यायालयाने दिला होता. मात्र राज्य सरकारचा जीआर एसटी कर्मचाऱ्यांना अमान्य असल्यामुळे एसटी कर्मचारी आजही संप पुकारला आहे.