मोठा निर्णय! शेतकऱ्यांना मिळणार थेट मदत, ओला दुष्काळाच्या सवलती लागू, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मंत्रिमंडळ बैठकीत पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा पूर्ण प्रयत्न राहिल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. 

मोठा निर्णय! शेतकऱ्यांना मिळणार थेट मदत, ओला दुष्काळाच्या सवलती लागू, मुख्यमंत्र्यांची घोषणा

आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले. याचवेळी राज्यात पावसामुळे  नुकसान झालेल्या बळीराजाबद्दलही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, संभाजीनगर जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली असून मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा पूर्ण प्रयत्न राहिल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. 

हेही वाचा – Maharashtra Cabinet Decisions : कर्करोगग्रस्तांसाठी महाकेअर फाऊंडेशन, तसेच उद्योगविभागासाठी विशेष तरतूद, मंत्रिमंडळ बैठकीतील 5 मोठे निर्णय 

मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की, आज महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. गेल्या महिन्यात सातत्याने अतिवृष्टी झाली. त्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याचा आढावा घेतला. यामध्ये सुमारे 60 लाख हेक्टर नुकसान झाले आहे. पहिल्या टप्प्यात ऑगस्ट पर्यंत 2 हजार 215 कोटी रुपये वितरित करण्यास सुरु केले. त्याचप्रमाणे ई-केवायसी अट शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दलची सर्व माहिती  पुढील दोन दिवसात मिळेल. 

हेही वाचा – Sharad Pawar : अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; शरद पवारांच्या राज्य सरकारकडे 'या' मागण्या 

सगळी मदत ही दिवाळीपूर्वी खात्यात दिली जाईल. सातत्याने ओला दुष्काळ मागणी होते. पण तशी तरतूद नाही. आजपर्यंत ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला. सर्व सवलती आता दुष्काळाप्रमाणे पुरानंतरही दिला जाईल. दुष्काळाच्या सवलती आता दिली जाईल. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number