Raghuveer Khedkar : महाराष्ट्राचा ‘सोंगाड्या’ पद्मश्रीचा मानकरी! अख्खा पंचक्रोशीत ख्याती असलेले रघुवीर खेडकर आहेत तरी कोण?

पद्म पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींच्या यादीत तमाशा फडातील 'सोंगाड्या'ची भूमिका करणारे कलावंत रघुवीर खेडकर यांच्या नावाचा देखील समावेश आहे. जाणून घ्या कोण आहेत रघुवीर खेडकर...

Raghuveer Khedkar : महाराष्ट्राचा ‘सोंगाड्या’ पद्मश्रीचा मानकरी! अख्खा पंचक्रोशीत ख्याती असलेले रघुवीर खेडकर आहेत तरी कोण?

केंद्र सरकारने 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून, यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तिमत्वांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. केंद्र सरकारने 45 मान्यवरांची पद्म पुरस्कारासाठी निवड केली आहे. या पुरस्कारांमुळे ग्रामीण महाराष्ट्रातील कला आणि मातीतील संशोधनावर शिक्कामोर्तब झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध लोकनाट्य तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना त्यांच्या कला क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानासाठी 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे. पद्म पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींच्या यादीत तमाशा फडातील 'सोंगाड्या'ची भूमिका करणारे कलावंत रघुवीर खेडकर यांच्या नावाचा देखील समावेश आहे. या विशेष समारंभात खेडकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दरम्यान प्रसिद्ध लोकनाट्य तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या… 

हेही वाचा- Padma Awards 2026 : केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड आणि अर्मिडा फर्नांडीस यांचा गौरव; पाहा विजेत्यांची यादी
रघुवीर खेडकर हे गेल्या चार दशकांहून अधिक काळ तमाशा रंगभूमीवर कार्यरत आहेत. उत्तम सोंगाड्या म्हणून त्यांना अख्खा पंचक्रोशीत ओळखले जाते. रघुवीर खेडकर यांच्या आई कांताबाई सातारकर यांनी उभे केलेल्या तमाशा मंडळाचे फडचालकही आहेत. तसेच ते नव्याने स्थापन झालेल्या 'अखिल भारतीय तमाशा परिषद' या संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्याचसोबत दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी तमाशा सादर करण्याचा मान रघुवीर खेडकर यांन मिळाला होता. एवढचं नव्हे तर चंदिगड येथे संगीत नाटक अकादमी, मुंबई विद्यापीठ येथेही त्यांनी तमाशा सादर केला आहे. त्यांच्या तरुणपणी त्यांनी बोर्डावर कथ्थक आणि लोककलेचे मिश्रण थाळीनृत्य देखील केले आहे. त्यांच्या या योगदानामुळे एक नामांकित कलाकार म्हणून त्यांची राज्यभरात ख्याती आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number