Maharashtra Weather Update : पुढील 24 तास महत्त्वाचे! उकाड्यामध्ये होणार प्रचंड वाढ, तर काही भागात पुन्हा गारपीटीची शक्यता

महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास महत्त्वाचे, जाणून घ्या कसे असणार हवामान

Maharashtra Weather Update : पुढील 24 तास महत्त्वाचे! उकाड्यामध्ये होणार प्रचंड वाढ, तर काही भागात पुन्हा गारपीटीची शक्यता

सध्या महाराष्ट्रात सर्वत्र हवामानाचा लपंडाव सुरू आहे. मार्च महिन्याच्या सुरूवातीला राज्यातील उकाडा वाढल्याचे चित्र होते. नंतर अचानक काही जिल्ह्यांमध्ये पावसाने गारपीटीसह झोडपले.अशातच आता हवामानामध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. 

पश्चिम महाराष्ट्रात तुफान वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  तर दुसरीकडे मुंबईसह कोकणात मात्र सर्वाधिक उष्णता वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार,   भूमध्य समुद्राकडून येणारे ओले वारे जेव्हा हिमालयाच्या भागात धडकतात, तेव्हा उत्तर भारतात पाऊस आणि बर्फवृष्टी होते. त्यामुळे सध्या देशात एक मजबूत वेस्टर्न डिस्टरबन्स आणि सायक्लोनिक सर्क्युलेशन यांचा एकत्रित परिणाम म्हणून अशी विचित्र स्थिती तयार झाली आहे. 

हेही वाचा – Aaditya Thackeray: 'भोंदू बाबासोबत फोटो असणाऱ्या मंत्र्यांवरही कारवाई करा…'; खरात प्रकरणात आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया 

 हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या महाराष्ट्रावर कोणतेही पावसाचे सावट नाही.  गेल्या काही दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला होता. मात्र, आता इथलं आकाश पूर्णपणे निरभ्र होणार आहे. 

हेही वाचा – Ashok Kharat Case: 'अशोक खरात ही महाराष्ट्रातली एपस्टीन फाईल…'; अरविंद सावंत यांचा महायुती सरकारवर निशाणा

मुंबईसह कोकण किनारपट्टीवरही आता आकाश स्वच्छ राहील, ज्यामुळे आर्द्रता कमी होऊन थोडा दिलासा मिळेल.महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number