Maharashtra Weather Update: अवकाळीच्या संकटानंतर आता महाराष्ट्राला उष्णतेचा तडाखा; राज्यात तापमान झपाट्याने वाढणार, IMD चा इशारा

राज्यात हवामानात सतत बदल होत असून मार्चमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होण्याचा IMD चा इशारा आहे.

Maharashtra Weather Update: अवकाळीच्या संकटानंतर आता महाराष्ट्राला उष्णतेचा तडाखा; राज्यात तापमान झपाट्याने वाढणार, IMD चा इशारा

Maharashtra weather update: राज्यात सध्या हवामानाचा पूर्णपणे लहरीपणा पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत गारठा जाणवत होता, त्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि आता अचानक उन्हाचा चटका वाढू लागला आहे. या बदलत्या वातावरणामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दरम्यान,IMDने मार्च महिन्यात तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

फेब्रुवारी महिन्यात राज्याच्या अनेक भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या पावसाचा फटका विशेषतः शेतकऱ्यांना बसला. अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले असून नुकसानभरपाईची मागणी करण्यात येत आहे. मात्र पावसाचा परिणाम ओसरताच वातावरणात झपाट्याने बदल झाला आणि उष्णतेची लाट जाणवू लागली.

हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत राज्यात प्रामुख्याने कोरडे आणि निरभ्र हवामान राहील. ढगाळ वातावरण किंवा पावसाची शक्यता अत्यल्प आहे. त्यामुळे दिवसाच्या तापमानात सातत्याने वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत उन्हाचा चटका अधिक जाणवू शकतो.

हेही वाचा:Mumbai Vijaydurg RO-RO Service: कोकणवारी झाली अधिक सुस्साट; भाऊच्या धक्क्यावरून सुटली पहिली रो-रो बोट; 390 प्रवाशांसह विजयदुर्ग बंदरात दाखल

कोकण पट्ट्यात दमट आणि उष्ण हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. समुद्रकिनारी भागात आर्द्रतेमुळे उकाड्याची तीव्रता अधिक जाणवू शकते. त्यामुळे नागरिकांनी उष्माघात टाळण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील विविध भागांतील तापमानातही मोठी तफावत दिसून येत आहे. काही भागात सकाळी गारवा जाणवत असला तरी दुपारी तापमान झपाट्याने वाढत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तापमानाचा पारा चढलेला दिसत आहे. काही शहरांमध्ये तापमानाने 35 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे, तर काही ठिकाणी किमान तापमान 12 अंशांच्या आसपास नोंदवले गेले आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वाढत्या उष्णतेमुळे यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील आठवड्यातही उष्णतेत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे आणि हलके, सूती कपडे परिधान करणे आवश्यक आहे.

हेही वाचा: Ajit Pawar Plane Crash : अक्षम्य चूक! कॉकपीटमधील थरारक व्हिडीओ, पायलटच्या सीटवर VSRचे मालक, लेकाची प्रशासनाकडे आर्त हाक

तज्ञांच्या मते, हवामानातील या झपाट्याने बदलणाऱ्या स्थितीमागे जागतिक तापमानवाढीचाही प्रभाव असू शकतो. बदलत्या हवामान पॅटर्नमुळे कधी पाऊस, कधी थंडी आणि अचानक उकाडा अशी स्थिती निर्माण होत आहे.

मार्चची सुरुवातच उष्णतेच्या इशाऱ्याने झाली असून येत्या दिवसांत राज्यातील नागरिकांना उन्हाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेत हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number