Maharashtra Weather News: राज्यात पारा घसरला ; चार जिल्हे गारठणार, हवामान विभागाचा इशारा

पुणे आणि साताऱ्यासह नाशिक व अहिल्यानगर परिसरातही गारठा वाढत आहे. महाबळेश्वरमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, साताऱ्यात ते नऊ अंशांपर्यंत खाली आले आहे.

Maharashtra Weather News: राज्यात पारा घसरला ; चार जिल्हे गारठणार, हवामान विभागाचा इशारा

पुणे: उत्तर दिशेकडून येणाऱ्या बोचऱ्या वाऱ्यांमुळे राज्यभर थंडीचा कडाका वाढला आहे. पहाटेच्या वेळी दाट धुके पसरत असून बाहेर पडताना नागरिकांना तीव्र थंडीचा सामना करावा लागत आहे. हिवाळ्याचा हा प्रभाव आता केवळ डोंगराळ भागापुरता मर्यादित न राहता शहरी आणि ग्रामीण भागातही स्पष्टपणे जाणवत आहे.

पुणे आणि सातारा जिल्ह्यात थंडीने सर्वाधिक तीव्र रूप धारण केले असून पहाटेपासूनच गारठा नागरिकांच्या अंगात शिरत आहे. महाबळेश्वर परिसरातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुण्यात गुलाबी थंडी अधिक जाणवू लागली आहे, तर साताऱ्यात तापमान आणखी घसरल्याने ‘मिनी काश्मीर’सारखी स्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या गारठ्याचा परिणाम दैनंदिन जीवनावर होत असून सकाळच्या वेळेस रस्ते ओस पडलेले दिसत आहेत.

हेही वाचा: Sydney Mass Shooting: सिडनी हल्ल्याचं पाकिस्तान कनेक्शन; संशयिताची ओळख पटली

हवामान विभागाच्या अंदाजानुसार धुळे, जेऊर, निफाड आणि परभणी या चार जिल्ह्यांमध्ये तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये किमान तापमान पाच ते सहा अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून, विशेषतः धुळे जिल्ह्यात तापमान 6 अंशांवर स्थिरावल्याने नागरिकांची चांगलीच अडचण होत आहे. पुढील काही दिवसांत तापमान आणखी खाली जाण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्येही थंडीचा जोर कायम आहे. जरी येत्या काही दिवसांत थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असली, तरी तापमानात फारसा मोठा बदल होणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. ला निनाच्या प्रभावामुळे ही थंडी जानेवारीपर्यंत टिकून राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुणे आणि साताऱ्यासह नाशिक व अहिल्यानगर परिसरातही गारठा वाढत आहे. महाबळेश्वरमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, साताऱ्यात ते नऊ अंशांपर्यंत खाली आले आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिक थंडीपासून बचाव करत आहेत. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

हेही वाचा: Sydney Mass Shooting: ऑस्ट्रेलियातील सिडनीत भीषण दहशतवादी हल्ला, अंधाधुंद गोळीबार; 10 ठार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number