Maharashtra Weather Alert : महाराष्ट्र तापणार! भारतीय हवामान विभागाने दिला धोक्याचा इशारा, अनेक भागात तापमान अधिक वाढण्याची शक्यता

भारतीय हवामान विभागाने दिनांक 2 मे रोजी नागपूर जिल्ह्यासाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. 

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्र तापणार! भारतीय हवामान विभागाने दिला धोक्याचा इशारा, अनेक भागात तापमान अधिक वाढण्याची शक्यता

सध्या राज्यातील वातावरणात फार मोठ्या प्रमाणात बदल होत असलेले बघायला मिळत आहेत. राज्यभरात अनेक ठिकाणी पारा 40 ते 45 अंशाच्या वर गेला आहे. अशातच आता मे महिना सुरू झाला आहे. त्यामुळे तापमा नेमका किती आकडा गाठणार? याकडे सर्वांचे लक्षा लागले आहे.  भारतीय हवामान विभागाने दिनांक 2 मे रोजी नागपूर जिल्ह्यासाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. 

कोकण विभागात कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज असून किमान तापमान 24 ते 26 अंशांपर्यंत नोंदवले जाऊ शकते. त्याचप्रमाणे मुंबई, रायगड आणि रत्नागिरी परिसरात दमट उकाडा जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

तसेच विदर्भातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळेत विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मराठवाड्यातही उष्णतेची तीव्रता कायम राहणार असून छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 39 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जाऊ शकते. किमान तापमान 22 ते 25 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर भागात कमाल तापमान 38 ते 41 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या विभागात किमान तापमान 20 ते 24 अंशांच्या दरम्यान राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमान 38-41 अंशांच्या दरम्यान राहील. तर किमान तापमान 22-25 अंशांच्या दरम्यान असेल. उष्णतेचा पारा आणखी वाढण्याची शक्यता असून पावसाचा अलर्ट नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number