राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह हजेरी लावली आहे. काही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाची गारपीटही झाली आहे. कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आजही भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात पुढील 3 ते 5 दिवस वादळी पावसासह गारपिटीची शक्यता. नाशिक, पुणे, सातारा, धाराशिव, लातूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात सतत पाऊस कोसळताना दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खास देखील हिरावला आहे.
हेही वाचा- Pashudhan Udyojak Yojana: राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! आता मिळणार 30 लाख रूपये, पण अटी लागू…
जुन्नर तालुक्यातील वडज परिसरात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यांनी आणि गारपिटीने मोठा तडाखा दिला आहे. आधीच युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतीमालाचे बाजारभाव घसरल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता निसर्गाच्या या प्रकोपामुळे दुहेरी संकट ओढावले आहे. तर जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मका गहू जवारी बाजरी हे पीक शेतकऱ्यांचे उध्वस्त झाले आहे. सोमवारी रात्री उशिरा झालेल्या अवकाळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील रब्बी हंगामातील गहू व उन्हाळी कांद्यासह संत्रा, केळी व लिंबू या फळपिकांचे नुकसान झाले आहे. विशेषतः गहू, कांदा व संत्रा या फळपिकांचे नुकसान अधिक प्रमाणांत झाले आहे. संत्रा, लिंबू, आंबा, पपई या फळपिकांचे देखील नुकसान झाले आहे.
हेही वाचा- Banana Export Crisis : इराण युद्धस्थितीचा शिपिंग कंपन्यांकडून गैरफायदा; अव्वाच्या सव्वा दरवाढ लादल्याने शेतकरी-व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे कांदा, बाजरी आणि दोडके यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उभी असलेली दोडक्याची बाग पूर्णपणे जमीनदोस्त झाली असून काढणीस तयार असलेला कांदा गारपिटीने झोडपल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या परिस्थितीमुळे बळीराजाचे डोळे पाणावले असून शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास कुठेतरी हिरावून गेल्यामुळे शेतकरी राजा चिंतेत सापडला आहे. शेतकऱ्यांना या पिकातून मोठे उत्पन्न मिळणार होते मात्र कापणीला आलेले पीकच उध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तत्काळ नुकसान भरपाई चे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे.