Maharashtra Weather Today: महाराष्ट्रावर दुहेरी संकट! एकीकडे उकाडा तर दुसरीकडे गारांसह पावसाचा इशारा; तुमच्या शहरात…

महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता वाढली असून काही भागांत कोरडे हवामान तर विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Weather Today: महाराष्ट्रावर दुहेरी संकट! एकीकडे उकाडा तर दुसरीकडे गारांसह पावसाचा इशारा; तुमच्या शहरात…

Maharashtra Weather Today: महाराष्ट्रात मार्चच्या अखेरीस तापमानाने पुन्हा जोर धरला असून राज्यातील विविध भागांत वेगवेगळे हवामान अनुभवायला मिळत आहे. एका बाजूला उष्णतेची लाट तीव्र होत असताना दुसऱ्या बाजूला काही भागांत अवकाळी पावसाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील काही दिवस विशेष काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

कोकण पट्ट्यात आज हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. मात्र उष्णता आणि आर्द्रतेमुळे दमट वातावरण जाणवणार आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता असून उकाडा वाढण्याची चिन्हे आहेत. पावसाची शक्यता नसली तरी घामाघूम करणारे हवामान नागरिकांना त्रासदायक ठरणार आहे.

हेही वाचा: MSRTC Electric Bus: प्रदूषणमुक्त 'लालपरी'! 2035 पर्यंत ST च्या 14 हजार बसेस होणार इलेक्ट्रिक; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

उत्तर महाराष्ट्रातही उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यांत आकाश मुख्यतः स्वच्छ राहील. कमाल तापमान 36 ते 40 अंशांपर्यंत पोहोचू शकते. काही भागांत उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता असल्याने दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून असलेले अवकाळी वातावरण आता कमी होत आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथे हवामान कोरडे राहील, तर तापमान 35 ते 38 अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या वादळी वाऱ्यांची शक्यता नाकारता येत नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर पावसाचा अंदाज नाही.

मराठवाड्यातही हवामान स्थिर होत असून पुढील काही दिवस पावसाची शक्यता कमी आहे. छत्रपती संभाजीनगरसह इतर जिल्ह्यांत तापमान 37 ते 40 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. यामुळे उष्णतेचा त्रास वाढू शकतो.

हेही वाचा: Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरात झपाट्याने वाढ; आजपासून किती पैसे मोजावे लागतील? जाणून घ्या

विदर्भात परिस्थिती काहीशी वेगळी आहे. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तापमान 38 ते 41 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असून उष्णता आणि पावसाचे मिश्र वातावरण राहणार आहे.

राज्यात उष्णतेचा प्रभाव वाढत असताना काही भागांत अजूनही अवकाळी परिस्थिती दिसून येत आहे. पुढील दोन दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत बाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number