वाहतूक कोंडीला चकवा देत विद्यार्थ्याने पॅराग्लायडिंगने गाठले परीक्षा केंद्र!

समर्थने परीक्षेसाठी वेळेवर पोहोचण्यासाठी त्याने पारंपरिक वाहतुकीचा मार्ग न निवडता थेट पॅराग्लायडिंगने सफर करण्याचा अवलंब केला. 

वाहतूक कोंडीला चकवा देत विद्यार्थ्याने पॅराग्लायडिंगने गाठले परीक्षा केंद्र!

महाराष्ट्रातील वाई तालुक्यातील पासराणी गावातील समर्थ महांगडे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. कारणच तसं अनोखं आहे! परीक्षेसाठी वेळेवर पोहोचण्यासाठी त्याने पारंपरिक वाहतुकीचा मार्ग न निवडता थेट पॅराग्लायडिंगने सफर करण्याचा अवलंब केला. 

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये समर्थ आपल्या कॉलेज बॅगसह आकाशात झेपावताना दिसतो. परीक्षेला अवघे  15-20  मिनिटे उरली असताना, वाहतुकीच्या कोंडीत अडकण्यापेक्षा त्याने हवेतून थेट परीक्षा केंद्र गाठण्याचा निर्णय घेतला.

कसा घडला हा अनोखा निर्णय?

समर्थ महांगडे आपल्या काही कामानिमित्त त्या दिवशी पाचगणी येथे गेला होता. मात्र, परतताना त्याला समजले की वाई-पाचगणी मार्गावर, विशेषतः पासराणी घाट परिसरात, मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत, गाडीने प्रवास केल्यास परीक्षेला उशीर होण्याची शक्यता होती. त्यामुळे साहसी क्रीडा तज्ज्ञ गोविंद येवले आणि त्यांच्या जीपी अ‍ॅडव्हेंचर्स टीमने समर्थसाठी एका अनोख्या मार्गाचा शोध घेतला—पॅराग्लायडिंग! त्याच्या सुरक्षित प्रवासाची पूर्ण तयारी करून, त्याला हवेतून परीक्षा केंद्राच्या दिशेने झेप घेता आली. काही क्षणांतच तो परीक्षा केंद्राजवळ सुखरूप उतरला आणि वेळेवर परीक्षेला उपस्थित राहिला.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

त्याचबरोबर समर्थच्या या अनोख्या प्रवासाने इंटरनेटवर जोरदार चर्चा रंगली आहे. अनेकांनी त्याच्या निर्णयक्षमतेचे कौतुक केले तर काहींनी याला ‘साहसी आणि कल्पकलेचा उत्तम संगम अश्या टिपण्या केल्या. 

 

हेही वाचा: रणवीर अल्लाहबादिया, समय रैनाला NCW कडून हजर राहण्याचे आदेश, नेटिझन्स म्हणतात ‘खऱ्या मुद्द्यांवर लक्ष द्या’

 

'कान्स'च्या रेड कार्पेटवर प्राजक्ता माळीचा अस्सल मराठी ठसका! फोटो पाहिलात का?

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number