Maharashtra SSC HSC Result 2025 Date: महाराष्ट्र बोर्ड 10वी-12वी निकाल 5 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता

10वी व 12वी बोर्ड निकाल 5 मे रोजी लागण्याची शक्यता; मंडळाची तयारी अंतिम टप्प्यात, विद्यार्थ्यांत उत्सुकता.

Maharashtra SSC HSC Result 2025 Date: महाराष्ट्र बोर्ड 10वी-12वी निकाल  5 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता 10वी (SSC) आणि 12वी (HSC) परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार, बोर्डाकडून 2025 सालचा निकाल 5 मे रोजी जाहीर केला जाऊ शकतो. यासाठी मंडळाकडून तयारी अंतिम टप्प्यात असून, अंतिम तारीख लवकरच अधिकृतरीत्या घोषित केली जाईल. विद्यार्थ्यांसह पालकांचंही या निकालाकडे लक्ष लागून राहिलं आहे.

या वर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षांना राज्यभरातून लाखो विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली. मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या या परीक्षांचा निकाल दरवर्षीप्रमाणे ऑनलाइन पद्धतीनेच जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थी अधिकृत संकेतस्थळांवर जाऊन आपला रोल नंबर आणि इतर आवश्यक माहिती भरून निकाल पाहू शकतात.

हेही वाचा: गुगल पे देतंय पर्सनल लोन; आता सहज मिळवा 30 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज

निकाल जाहीर होण्यासाठी महत्त्वाची संकेतस्थळे:

  • mahresult.nic.in
  • mahahsscboard.in
  • results.gov.in
  • hscresult.mkcl.org
  • sscresult.mkcl.org

वरील कोणत्याही संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना आपला निकाल सहज पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेला सीट नंबर आणि आईचे नाव तयार ठेवणे आवश्यक आहे.

निकालात असणारी माहिती:

  • विषयनिहाय गुण
  • प्राप्त गुणांची टक्केवारी
  • उत्तीर्ण / अनुत्तीर्ण स्थिती
  • श्रेणी (डिस्टिंक्शन, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास इत्यादी)

पुनर्मूल्यांकन व पुरवणी परीक्षा

जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल की त्याच्या गुणांमध्ये काही चूक झाली आहे, तर तो पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतो. पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया निकालानंतर काही दिवसांत सुरू केली जाते. तसेच जे विद्यार्थी एखाद्या किंवा दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाले आहेत, त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षा आयोजित केली जाते. ह्यामुळे विद्यार्थ्यांना वर्ष वाया न घालवता पुन्हा एक संधी मिळते.

विद्यार्थी व पालकांसाठी सूचना

निकालाच्या दिवशी वेबसाइट्सवर तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता असते, त्यामुळे संयम बाळगावा. विद्यार्थ्यांनी अधिकृत स्रोतावरच विश्वास ठेवावा आणि अफवांपासून सावध रहावं. तसेच निकालाच्या आधारावर पुढील करिअरचा निर्णय घ्यावा आणि आवश्यकतेनुसार मार्गदर्शन घ्यावं.

महाराष्ट्र बोर्डाचा निकाल केवळ गुणपत्रक नसून, विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि भविष्यातील वाटचालीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे निकालाच्या निकालाच्या तयारीत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number