Dattartya Bharane: कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, 11587 शेतकरी तरुणांना मिळणार रोजगार, काय आहे नेमकी योजना?

या योजनेतून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आणि ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना मिळेल.

Dattartya Bharane: कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा,  11587 शेतकरी तरुणांना मिळणार रोजगार, काय आहे नेमकी योजना?

मुंबई: “शेतीत बदल हवा, तर शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान पोहोचले पाहिजे” या विचाराला मूर्त रूप देत राज्य सरकार आता ‘शेतकरी मित्र’ ही नवी संकल्पना राबवण्याच्या तयारीत आहे. पारंपरिक पद्धतींपासून आधुनिक तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत असलेल्या कृषी क्षेत्राला नवी चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या योजनेची माहिती देताना सांगितले की, सध्या राज्यात 11,587 कृषी पर्यवेक्षक कार्यरत आहेत. या प्रत्येक पर्यवेक्षकासोबत एक ‘शेतकरी मित्र’ नियुक्त करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. अनुभवी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जाण असलेल्या शेतकऱ्यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू असून, यासाठी आवश्यक अटी व नियम निश्चित केले जात आहेत.

हेही वाचा: West Bengal CM Oath Ceremony: पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय, ‘या’ दिवशी पार पडणार मुख्यमंत्री शपथविधी सोहळा

‘शेतकरी मित्र’ या संकल्पनेतून निवड झालेल्या व्यक्तींना वर्षातून चार टप्प्यांत शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे. या योजनेत 40 वर्षांखालील उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असून, त्यामध्ये 30 टक्के महिलांसाठी राखीव स्थान असेल. संवाद कौशल्य उत्तम असणे, समाजसेवेची आवड आणि सोशल मीडियाचे ज्ञान असणे या अटी आवश्यक ठेवण्यात आल्या आहेत. कृषी क्षेत्रातील पदवीधर आणि अनुभव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.

ही योजना 1 जून 2026 पासून राज्यभरात लागू होणार असून, प्रत्येक सहाय्यक कृषी अधिकाऱ्यासोबत ‘शेतकरी मित्र’ जोडला जाणार आहे. यामुळे शासनाच्या योजना आणि तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे अधिक सुलभ होणार आहे. ‘शेतकरी मित्र’ ही योजना दुवा ठरून योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा आहे.

एकूणच, ‘शेतकरी मित्र’ योजना ही केवळ रोजगारनिर्मितीचा मार्ग नाही, तर शेतीत नवसंजीवनी देणारा उपक्रम ठरणार आहे. ग्रामीण भागातील तरुणांना नवी दिशा देत, शेतीमध्ये आधुनिकतेचा अवलंब करण्यासाठी हा निर्णय निर्णायक ठरू शकतो, असा विश्वास कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला आहे. 

हेही वाचा: West Bengal Chief Minister : पश्चिम बंगालमधील अभूतपूर्व यशानंतर कोण होणार मुख्यमंत्री? भाजपमधून ‘ही’ नावं चर्चेत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number