Maharashtra Rain Update: राज्यात वेगवेगळ्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात अनेक ठिकाणी पडणारा पाऊस कधी थांबणार असा प्रश्न शेतकरी करत आहेत. अशातच येत्या 8 ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
29 सप्टेंबरपासून राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर आहे. मात्र 2 ते 7 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे तो प्रामुख्याने मेघ गर्जनेसह राहील आणि दुपारनंतर पडेल. वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता विदर्भात राहील. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे. 7 ऑक्टोबरपासून राज्यात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल आणि 8 ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेईल. त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून निरोप घेईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस कोसळला होता. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, वाशिम, नाशिक, ठाणे, रायगडसह मुंबईतही पावसाने धुमाकूळ घातला होता. अनेक जिल्ह्यात रस्त्यावर पाणी साचलं होतं आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. राज्यात 7 ऑक्टोबर 2025 पासून हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल आणि 8 ऑक्टोबर 2025 पासून मान्सून राज्यातून निरोप घेईल. त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून निरोप घेईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.