Maharashtra Rain Red Alert Update: मुंबईसह या 5 जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’; हवामान विभागाने दिलं सतर्कतेचा इशारा, जारी केल्या महत्त्वाच्या सूचना

अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे.

Maharashtra Rain Red Alert Update: मुंबईसह या 5 जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’; हवामान विभागाने दिलं सतर्कतेचा इशारा, जारी केल्या महत्त्वाच्या सूचना

राज्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून पुढील 24 तासांत अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी रेड तसेच ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण विभागातील पालघर, ठाणे आणि मुंबई येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दुसरीकडे, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि घाटमाथा परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे नद्या, ओढे आणि धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच डोंगराळ भागांत दरड कोसळण्याचा धोका वाढल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या महत्त्वाच्या सूचना:

– अतिआवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा.
– पाणी साचलेल्या रस्त्यांवरून किंवा पूरग्रस्त भागांतून प्रवास करू नका.
– डोंगराळ भाग आणि घाटरस्त्यांवर विशेष खबरदारी घ्या.
– मच्छीमारांनी पुढील आदेश येईपर्यंत समुद्रात जाणे टाळावे.
 – स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.

दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे प्रशासन सतर्क झाले असून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number