Maharashtra Rain Alert : राज्यात अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान; हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचा जोर वाढला असून, हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात सतर्कतेचा इशारा दिला आहे. शेती आणि वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

Maharashtra Rain Alert : राज्यात अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान; हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची जोरदार परतफेड होत असून, राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान खात्याने इशारा दिला आहे. पूर्व मध्य अरबी समुद्र, पूर्व विदर्भ आणि दक्षिण छत्तीसगडच्या परिसरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने हवामानात मोठे बदल दिसत आहेत. हवामान तज्ज्ञ सांगतात, ‘मोंथा’ चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला असला तरी त्यातून तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ आणि गुजरातच्या दिशेने वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडत आहे.

पुढील 36 ते 48 तास हवामानातील बदलासाठी निर्णायक ठरणार असून, महाराष्ट्र आणि गुजरातला हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 3 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबरदरम्यान पुन्हा एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या काळात पावसाचा जोर कायम राहू शकतो, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

हेही वाचा: Raj Thackeray : 'तर शिवनेरी, रायगडवरील नमो टुरिझम सेंटर फोडणार…', राज ठाकरेंचा आक्रमक इशारा

मुंबई आणि कोकण पट्ट्यात पहाटेपासूनच रिमझिम पाऊस सुरू असून, काही भागात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. 3 नोव्हेंबरपर्यंत पावसाची तीव्रता थोडी कमी होईल, मात्र हलका पाऊस सुरू राहणार असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मोंथा चक्रीवादळाचा परिणाम अधिक जाणवत आहे. सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावल्याने भातशेती पाण्याखाली गेली आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड आणि मंगरुळपीर भागातही जोरदार पावसाने कपाशी आणि तुरीच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि सुरगाणा भागात मुसळधार पावसानं शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पिकं पाण्याखाली गेली असून, काढणीला आलेला भात भिजून खराब झाला आहे. नांदेड जिल्ह्यात हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ दिला असून, हदगाव परिसरात ढगफुटी सदृश्य पावसानं नदी-नाल्यांना पूर आला आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या अवकाळी पावसामुळे शेती आणि वाहतुकीवर परिणाम झाला असून, शेतकऱ्यांमध्ये काळजी वाढली आहे.

हेही वाचा: New CJI: भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती; 24 नोव्हेंबरला स्वीकारणार पदभार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number