ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मिनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिल्याने तो शिवसेनेसाठी एक मोठा धक्का बसला आहे. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने ते आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महापालिका निवडणूक तोंडावर असताना ठाण्यात शिवसेनेत नाराजीनाट्य रंगल्याचं दिसून आलं. शिवसेना महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेतून वायचळ यांची हकालपट्टी केल्यानंतर मीनाक्षी शिंदे नाराज होत्या अशी माहिती समोर येत आहे.