शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ या नावाने चर्चांना उधाण आले आहे. या कार्यक्रमात त्या सहा खासदारांचा पक्षप्रवेश होणार असल्याच्या अफवा आणि तर्कवितर्क सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात फिरत आहेत. मात्र, या सर्व चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आज होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात कोणत्याही प्रकारचा पक्षप्रवेश होणार नाही, अशी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. विशेषतः19 तारखेला मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भातील सर्व दावे निराधार असून, कोणत्याही प्रकारचा विशेष राजकीय कार्यक्रम किंवा ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत प्रवेशाचा निर्णय घेतलेला नाही.
दरम्यान, शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याला नेहमीप्रमाणे पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम पक्षाच्या संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आगामी राजकीय दिशा यावर केंद्रित असणार आहे.राजकीय वर्तुळात उठलेल्या चर्चांमुळे काही काळ संभ्रम निर्माण झाला असला तरी पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलेल्या भूमिकेमुळे सर्व गैरसमज दूर झाले आहेत. वर्धापन दिन हा केवळ संघटनात्मक आणि उत्सवी कार्यक्रम असून त्यात कोणतेही मोठे राजकीय ‘ऑपरेशन’ किंवा प्रवेश कार्यक्रम नाही, असे पुन्हा अधोरेखित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आता लक्ष वर्धापन दिनाच्या प्रत्यक्ष सोहळ्यावर केंद्रित झाले असून, पक्षाच्या पुढील राजकीय रणनीतीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.