महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथ होताना दिसत आहे. मनोज जरांगे यांनी जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अशातच आता जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत सर्व काही स्पष्ट केले आहे. जरांगे यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे या पत्रकार परिषदेमध्ये मांडले आहेत. तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देण्यामागे कोणाचा हात असू शकतो याबद्दलदेखील स्पष्टपणे भाष्य केले आहे.
मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट आखण्यात आल्याचे ऐकायला मिळाले होते. मात्र जरांगे यांनी या हत्येच्या कटामध्ये माजी मंत्री धंनजय मुंडे यांचा सहभाग असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. यावेळी ते म्हणाले कि, आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांचे आणि धनंजय मुंडे यांच्या भेटी झाल्या आहेत. तर आपल्या हत्येचा कट उधळण्याअगोदरच 12 वाजता आरोपी आणि धनंजय मुंडे यांचे बोलणे झाल्याचा आरोप त्यांनी केला. धनंजय मुंडे हे या कटाचे मुख्य सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. त्यांची चौकशी करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील
पुढे ते म्हणाले कि, आपल्या वाहनाला दुसऱ्या वाहनाची धडक देण्याची योजना पण असल्याचा दावा जरांगेंनी केला. मुंडे यांचे हे नपूंसक चाळे आहे. त्यांनी थेट येऊन भिडायला हवे होते असा आव्हान त्यांनी दिले. त्यांनी यावेळी मुंडेंवर अनेक गंभीर आरोप केले. मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील होती. भाऊबीजेच्या दिवशी बैठक झाली होती. मला जुनी गाडी द्या, मी गाडीनेच ठोकतो, असे आरोपी म्हणाले. घातपात करून माणूस राजकारणात मोठा होत नाही. धनंजय मुंडेंची अशी वृत्ती चांगली नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केलाय.
व्हिडीओ