‘जिल्हा परिषद निवडणुकांना ना कोणता डेल्टा ना कोणता व्हायरस’

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजासंदर्भात आक्षेप नोंदवण्यासाठी भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर भाजप नेते यावेळी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे विधिमंडळ अधिवेशन, ओबीसी आरक्षण आणि विधानसभा अध्यक्ष निवडणूक याबाबत मागण्या केल्या आहेत. […]

‘जिल्हा परिषद निवडणुकांना ना कोणता डेल्टा ना कोणता व्हायरस’

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजासंदर्भात आक्षेप नोंदवण्यासाठी भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर भाजप नेते यावेळी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे विधिमंडळ अधिवेशन, ओबीसी आरक्षण आणि विधानसभा अध्यक्ष निवडणूक याबाबत मागण्या केल्या आहेत.

‘राज्य सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे. सरकारी पक्षाचे कार्यक्रम होतात, पण कोरोनाचे कारण सांगून अधिवेशन मात्र दोन दिवसांचं घेतलं जातंय. अधिवेशन दोन दिवसांचं आणि जिल्हा परिषद निवडणुका मात्र होतात, त्याला कोणता डेल्टा नाही ना कोणता व्हायरस’, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

‘सरकारमधील घोटाळे बाहेर येत आहेत. महाराष्ट्रात विद्यार्थी, महिला, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण याचा आक्रोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे अधिवेशनापासून पळ काढला जात आहे’, असं फडणवीस म्हणाले.

‘विधानसभा अध्यक्षांचं पद रिक्त ठेवता येत नाही. अध्यक्षपद रिक्त झाल्यानंतर ते तसंच ठेवता येत नाही, असं संविधान सांगत. मात्र, तरीही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जात नाही. अध्यक्षपद रिक्त ठेवण हे संविधानाचं अवमुल्यन करण्यासारखं आहे, असंदेखील फडणवीस म्हणाले.

तसेच, ‘आम्ही आंदोलन करणार आहोतच, निवडणुका जर घेणार असाल तरीही भाजप या जागांवर केवळ ओबीसी उमेदवार देईल. निवडणूक जिंकलो किंवा हरलो, तरी ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजप पाठपुरावा करेल’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number