आमदाराच्या लेकाचा थाटच न्यारा! तब्बल इतक्या लाखांची घोडी केली खरेदी

घोडेबाजारात साडेतीन हजार घोड्यांचा टप्पा पार होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे एकूणच घोडेबाजारात प्रचंड तेजी पाहण्यास मिळणार आहे. <br/><br/>

आमदाराच्या लेकाचा थाटच न्यारा! तब्बल इतक्या लाखांची घोडी केली खरेदी

जातिवंत घोड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंखेडा घोडेबाजाराला सुरुवात झाली असून घोडेबाजारात पहिल्याच दिवशी खरेदी विक्रीचा उच्चांक गाठला गेला आहे या बाजारात अकरा लाख रुपये किमतीला एका घोड्याची विक्री झाली असून पुणे जिल्ह्यातील दौंड येथील आमदार राहुल कुल यांचे चिरंजीव आदित्य कुल यांनी अकरा लाखाची घोडी खरेदी केली आहे एकूणच सारंगखेडा घोडेबाजारात प्रचंड तेजी दिसून येत असून यावर्षी आतापर्यंत 2500 पेक्षा अधिक घोडे दाखल झाले आहेत अजून पाच दिवसात घोडेबाजारात साडेतीन हजार घोड्यांचा टप्पा पार होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे एकूणच घोडेबाजारात प्रचंड तेजी पाहण्यास मिळणार आहे. 

हेही वाचा – Beed Teachers Suspended: बीडमध्ये शिक्षण विभागाची धडक कारवाई; 14 शिक्षक निलंबित, कारण काय?

दिग्गज सेलिब्रिटींच्या अश्वप्रेमाची खूप चर्चा रंगते. नंदूरबार सारंगखेडा येथील अश्व बाजार जगभरात प्रसिद्ध आहे.विविध राज्यातील व्यापारी अश्व विक्रीसाठी या बाजारात दाखल झाले आहेत. दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांचा मुलगा आदित्य कुलने या अश्वबाजारात 11,11,111 रुपयांची घोडी खरेदी केली आहे.

हेही वाचा – Farmer Story : आधी शेतकऱ्याची उडवली खिल्ली पण त्याने मानली नाही हार, केली 200 दुर्मिळ झाडांची लागवड 

आतापर्यंत घोड्यांच्या विक्रीतून 50 लाखांच्यावर उलाढाल झाली आहे.असे असले तरी युवराज,सुलतान,रुबी आणि मानसी या अश्वांची चर्चा असून अश्व शौकीन त्यांना पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. भरतपूर (राजस्थान)येथील कृष्णवीरसिंग राजपूत यांच्या मालकीची 20 महिने वयाची नुकरा जातीची घोडी दौंडचे आमदार राहूल कुल यांचे पुत्र आदित्य याने 11 लाख 11 हजार 111 रुपयांमध्ये खरेदी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number