Sanjay Gaikwad On Election Result : निवडणुकीच्या निकालावर संजय गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया

बुलढाणा नगरपालिकेसाठी शिवसेनेचे संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा संजय गायकवाड यांचा विजय निश्चित मानला जात आहे. निवडणुकीच्या निकालावर संजय गायकवाड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

Sanjay Gaikwad On Election Result : निवडणुकीच्या निकालावर संजय गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या 23 नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. काही ठिकाणी उमेदवारांनी न्यायालयात दाखल केलेल्या अपिलांवर वेळेत निर्णय न झाल्याने त्या ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अखेर या 23 नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा- Kankavli Sandesh Parkar : निलेश राणेंमुळे ठाकरे गटाचा उमेदवार विजयी, नितेश राणेंना धक्का

दरम्यान या निवडणुकांची मतमोजणी रविवारी, 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू झाली आहे. आज होणाऱ्या नगर परिषदा आणि नगर पंचायत निवडणुकीच्या निकालाचा कौल मतदारराजा कोणाच्या नावाने देणार हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे. काही जागांचे कल येण्यास सुरूवाती झाली असून काही ठिकाणी धक्कादायक निकाल समोर आले आहेत. अशातच बुलढाणा नगरपालिकेसाठी शिवसेनेचे संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा संजय गायकवाड यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

हेही वाचा- Kokan Election Result 2025: कोकणात महायुतीचा झंझावात; भास्कर जाधवांना मोठा धक्का, तर रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजप-शिंदे सेनेचे वर्चस्व

खामगाव नगरपालिकेत भाजपच्या अपर्णा सागर फुंडकर आघाडीवर असल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून खामगाव मतमोजणी केंद्र बाहेर जल्लोष साजरा केला जात आहे. तसेच दुसरीकडे बुलढाणा नगरपालिकेत शिवसेनेच्या पूजा संजय गायकवाड आघाडीवर असल्यामुळे बुलढाण्यात शिवसेनेकडून देखील जल्लोष साजरा केला जात आहे. याचपार्श्वभूमिवर निवडणुकीच्या निकालावर संजय गायकवाड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number