मुंबई : महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आज, मंगळवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर, काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने तेथे 'येलो अलर्ट'ही जारी केला आहे. कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, पालघर जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. जळगाव, अहिल्यानगर आणि नाशिकमध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिकच्या घाटमाथा भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
कोकण विभागातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर पालघर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. जळगाव, अहिल्यानगर आणि नाशिकमध्ये मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. नाशिकच्या घाटमाथा भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा भागांसाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मराठवाडा विभागात, हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी हवामानाचा कोणताही विशेष इशारा (forecast) जारी करण्यात आलेला नाही. यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांसाठी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे हिमाचलमधील सात जिल्ह्यांत अचानक पूर (flash flood) येण्याचा इशारा राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने, हवामान विभागाने सोमवारी हिमाचल प्रदेशातील किमान सात जिल्ह्यांत अचानक पूर येण्याचा इशारा दिला. सिमला हवामान केंद्राने मंगळवार सकाळपर्यंत चंबा, कांगडा, कुल्लू, मंडी, सिमला, सिरमौर आणि सोलन जिल्ह्यांतील भागांमध्ये अचानक पूर येण्याचा धोका कमी असल्याचे संकेत दिले आहेत. हवामान विभागाने सोमवारी संध्याकाळी चंबा, कांगडा, उना, सोलन, सिरमौर आणि बिलासपूर जिल्ह्यांतील काही ठिकाणी पुढील 12 तासांत मुसळधार पावसासाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला. तसेच, 9 ऑगस्टपर्यंत राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा ‘येलो’ अलर्टही जारी करण्यात आला. धोकादायक क्षेत्रांमध्ये दरड कोसळण्याची आणि अचानक पूर येण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे.