टाळेबंदी शिथिल करण्याबाबत मंत्री विजय वडेट्टीवार यांचं स्पष्टीकरण

राज्यात टाळेबंदीवरुन सुरु असलेल्या गोंधळावर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आज मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव देण्यात आला असून दुपारपर्यंत अधिसूचना निघेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. राज्यातील १८ जिल्ह्यांतील सर्व निर्बंध हटवण्यात आल्याच्या विजय वडेट्टीवार यांच्या घोषणेने गुरुवारी गोंधळ उडाला होता. असा कोणताही निर्णयच झाला नसल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं स्पष्ट केलं […]

टाळेबंदी शिथिल करण्याबाबत मंत्री विजय वडेट्टीवार यांचं स्पष्टीकरण

राज्यात टाळेबंदीवरुन सुरु असलेल्या गोंधळावर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आज मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव देण्यात आला असून दुपारपर्यंत अधिसूचना निघेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

राज्यातील १८ जिल्ह्यांतील सर्व निर्बंध हटवण्यात आल्याच्या विजय वडेट्टीवार यांच्या घोषणेने गुरुवारी गोंधळ उडाला होता. असा कोणताही निर्णयच झाला नसल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं स्पष्ट केलं होतं.

अंतिम प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला असून त्यांची संमती मिळाल्यानंतर अधिसूचना निघेल. जिल्ह्यातील परिस्थितीनुसार ते लागू होईल, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number