‘१५ जूनपर्यंत कोरोना नियंत्रणामध्ये आला तरच टाळेबंदी हटवणार’

राज्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लागू करण्यात आलेली टाळेबंदी १ जून रोजी संपत असून टाळेबंदी वाढणार की शिथिल होणार यासंबंधी चर्चा सुरु आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी वाढवली जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टाळेबंदीसंबंधी संकेत दिले आहेत. ‘जिल्ह्यात जास्त रुग्णसंख्या असणाऱ्या तालुक्यांमध्ये कडक […]

‘१५ जूनपर्यंत कोरोना नियंत्रणामध्ये आला तरच टाळेबंदी हटवणार’

राज्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लागू करण्यात आलेली टाळेबंदी १ जून रोजी संपत असून टाळेबंदी वाढणार की शिथिल होणार यासंबंधी चर्चा सुरु आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी वाढवली जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टाळेबंदीसंबंधी संकेत दिले आहेत.

‘जिल्ह्यात जास्त रुग्णसंख्या असणाऱ्या तालुक्यांमध्ये कडक निर्बंध करावेत आणि ज्या तालुक्यात रुग्ण नाही तिथे थोडी सवलत द्यावी. तसंच बाकीच्या जिल्ह्यात मात्र टप्प्यापटप्य्याने टाळेबंदी शिथिल करावी असा विचार असून त्यादृष्टीने पाऊल टाकत आहोत’,असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी बंदच राहणार

‘मुंबई लोकलमध्ये कोरोनाचा मोठा फैलाव होण्याची शक्यता असते, त्यामुळे रेल्वेत जी गर्दी होते त्याचा गांभीर्याने विचार व्हावा अशी अनेकांची मागणी आहे. म्हणून आम्ही अत्यावश्यक सेवा सोडून कोणालाही लोकलने प्रवास करण्याची परवानगी देणार नाही,अजून कुठल्या घटकासाठी लोकल प्रवासाला मुभा देण्यात यावी का याचा विचार करण्यात येईल’, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number