जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
ट्रिपल महाराष्ट्रक केसरी विजय चौधरीला अखेर सरकारी नोकरी मिळाली. विजय चौधरीची पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विजय चौधरीनं 2014 ते 2016 असे सलग 3 वर्षं महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. त्याला शासकीय सेवेत घेणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी डिसेंबर 2016मध्ये जाहीर केलं होतं.
हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली होती. अखेर विजय चौधरीला सरकारी नोकरी मिळाली आहे. त्यामुळे सरकारी नोकरीचं आश्वासन मिळालेल्या महाराष्ट्रातल्या इतर खेळाडूंची प्रतीक्षा लवकरच संपेल, अशी अपेक्षा.