पुण्यातील वाघोलीमध्ये पार पडलेल्या 68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने पटकावले. मनाच्या चांदीच्या गदेसाठी झालेल्या लढतीत हर्षवर्धनने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला 4-3 अशा गुणांच्या फरकाने पराभूत केले. त्यामुळे हर्षवर्धन सातवा डबल महाराष्ट्र केसरी ठरला.
गायकवाडला 30 सेंकदाच्या ऍक्टिव्हिटी वेळेत गुण मिळवता न आल्याने हर्षवर्धनला 1 गुण मिळाले. पण शेवटच्या क्षणी हर्षवर्धनने दोन गुण मिळवत आघाडी घेतली. शेवटी महेंद्रनेही 2 गुण मिळाले.पहिली फेरी बरोबरीत राहिल्याने आता पुढील फेरीत काय होतं याची उत्सूकता कुस्तीप्रेमींना लागून होती. मात्र हर्षवर्धन या अंतिम फेरीत यशस्वी ठरला. हर्षवर्धनने मानाच्या चांदीच्या गदेवर आपली मोहोर उमटवली. हर्षवर्धन जिंकताच मॅटवर त्याच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली. हर्षवर्धनला त्याच्या चाहत्यांनी त्याला खांद्यावर उचलून घेतलं आणि जल्लोष केला.