Maharashtra Kesari Prize Money : महाराष्ट्र केसरी विजेत्याला लागणार लॉटरी! काय-काय मिळणार बक्षीस? ऐकून व्हाल थक्क

बक्षीस वितरण समारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

Maharashtra Kesari Prize Money : महाराष्ट्र केसरी विजेत्याला लागणार लॉटरी! काय-काय मिळणार बक्षीस? ऐकून व्हाल थक्क

68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम निकाल आज जाहीर होणार आहे. त्यामुळे आता  नवीन 'महाराष्ट्र केसरी' कोण ठरणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.  पुण्यातील वाघोली येथे आज महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम थरार रंगणार आहे. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

विजेत्या मल्लावर बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. विजेत्याला बक्षीस म्हणून फॉर्च्युनर गाडीचे आकर्षण सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या आयोजनाखाली होत असलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत विजेत्याला मानाची गदा, 5 लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि फॉर्च्युनर गाडी देण्यात मिळणार आहे. 

हेही वाचा – Leopard Bittu Death: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'बिट्टू' बिबट्याचा मृत्यू; सरनाईक कुटुंबावर शोककळा 

या स्पर्धेत 5  माजी महाराष्ट्र केसरींचा सहभाग होता. यात अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले असून शिवराज राक्षे, पृथ्वीराज पाटील आणि गतविजेता पृथ्वीराज मोहोळ यांना स्पर्धेच्या सुरुवातीलाच पराभवाचा धक्का सहन करावा लागला. आता महाराष्ट्राचा नवा महाराष्ट्र केसरी कोण होणार आणि ही मानाची गदा कोणाच्या खांद्यावर विसावणार? हे पाहण्यासाठी काही तासांची प्रतीक्षा उरली आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number