दावोस: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या स्वित्झर्लंड मधील दावोस येथे असून, World Economic Forum (WEF) मध्ये महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी ते सक्रियपणे सहभागी झाले आहेत. जागतिक पातळीवरील उद्योग समूह, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांशी थेट संवाद साधत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि आधुनिक पायाभूत सुविधांचा विकास साधण्यावर त्यांचा भर आहे.
महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या विविध सामंजस्य करारांवर (MoUs) स्वाक्षऱ्या होत आहेत. या करारांच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक (Investment) आणून राज्याचा सर्वांगीण विकास साधण्याची स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे. याच अनुषंगाने दावोसहून त्यांनी माध्यमांशी संवाद साधत महाराष्ट्रासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याची माहिती दिली.
Had a wonderful and engaging discussion with Jessica Rosenworcel, Executive Director, MIT Media Lab, at #WEF26 in Davos. Our conversation focused on the transformative role of Digital Public Infrastructure in India and how it is enabling inclusive governance. We also discussed… pic.twitter.com/m08KAOPBTh — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 20, 2026
मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात विविध सेक्टर मध्ये उच्च दर्जाचे काम करण्याची मोठी संधी आहे. प्रत्येक शहरातील Urban Transport System अधिक सक्षम आणि आधुनिक करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच राज्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य आणि त्यासंबंधीत सुविधा पुरवायच्या असतील, तर MedTech Sector मध्ये गुंतवणूक अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
MedTech संदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या क्षेत्रासाठी एक स्पष्ट आणि सशक्त रोडमॅप तयार करण्यात आला असून, त्यानुसार आंतरराष्ट्रीय पातळीवरून गुंतवणुकीच्या अनेक ऑफर्स समोर आल्या आहेत. महाराष्ट्रात MedTech Start-up Ecosystem मोठ्या प्रमाणात विकसित करण्याचा आमचा मानस असून, त्यामुळे आरोग्य सेवा आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
रायगड जिल्ह्यातील पेन प्रकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, हा प्रकल्प जागतिक स्तरावर महत्त्वाचा ठरणार आहे. ही जगातील पहिली अशी कंपनी असेल, जिथे Public-Private Partnership (PPP) च्या माध्यमातून कामकाज केले जाणार आहे. या प्रकल्पामुळे रायगड परिसराच्या औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.
Pleased to meet H. E. Mr. Ville Tavio, Minister for Foreign Trade and Development of Finland, at #WEF2026 in Davos. Our discussions focused on strengthening collaboration in the Circular Economy, innovation, and advanced technologies. We discussed plans to organise a Circular… pic.twitter.com/G2yWT2MktA — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 20, 2026
मुंबईबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणून Job Creation करण्याची ठोस योजना आखण्यात आली आहे. मुंबईत एक भव्य Business District उभारण्यात येत असून, यामुळे शहराची आर्थिक ताकद अधिक बळकट होणार आहे. यासोबतच GCC (Global Capability Centre) आणि FinTech Ecosystem विकसित करण्यावरही भर देण्यात येत आहे.
दावोस येथे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. यामध्ये SSB Switzerland Group, Ensar USA Group, FedEx Group (USA), River Recycle (Finland), MGSA Group (Dubai) आणि Tribeca Developers (USA) यांचा समावेश आहे. वेगवेगळ्या देशांतील कंपन्यांनी महाराष्ट्रात एक लाख कोटी रुपयांच्या आसपास गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
शेवटी मुख्यमंत्री म्हणाले की, आपण ज्या तिसऱ्या मुंबई (Third Mumbai) ची उभारणी करत आहोत, त्या तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर यशस्वीपणे लॉन्च झाले आहे. येत्या काळात हे शहर आधुनिक पायाभूत सुविधा, उद्योग आणि रोजगारनिर्मितीचे केंद्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दावोसहून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.