राज्यातील बारावीची परीक्षा अखेर रद्द!

देशात कोरोना प्रादुर्भावामुळे सीबीएसईसह इतर केंद्रीय मंडळांनी बारावीची परीक्षा रद्द केल्यानंतर महाराष्ट्रातील बारावीची परीक्षा रद्द करण्याची अधिकृत घोषणा गुरुवारी करण्यात आली. तसेच राज्य मंडळाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापनाचे धोरण आणि निकालाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असं यावेळी सांगण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता या कारणांसाठी राज्य सरकारने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. बारावीच्या विद्यार्थ्यांचे […]

राज्यातील बारावीची परीक्षा अखेर रद्द!

देशात कोरोना प्रादुर्भावामुळे सीबीएसईसह इतर केंद्रीय मंडळांनी बारावीची परीक्षा रद्द केल्यानंतर महाराष्ट्रातील बारावीची परीक्षा रद्द करण्याची अधिकृत घोषणा गुरुवारी करण्यात आली.

तसेच राज्य मंडळाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापनाचे धोरण आणि निकालाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असं यावेळी सांगण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता या कारणांसाठी राज्य सरकारने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

बारावीच्या विद्यार्थ्यांचे अचूक मूल्यमापन करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग कटिबद्ध आहे, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. बारावीची परीक्षा रद्द करावी, अशी भूमिका राज्याने केंद्राच्या बैठकीतही मांडली होती. त्याबाबत बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. परीक्षा रद्द करण्याच्या प्रस्तावाला आपत्ती व्यवस्थापन विभागाने मान्यता दिल्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number