Maharashtra Heat Wave SOP: उन्हाच्या तडाख्यामुळे सरकारने बदलली कामाची वेळ; तुमच्या कामाचे वेळापत्रक काय आहे पाहा?

महाराष्ट्र सरकारने हीटवेव्हच्या पार्श्वभूमीवर बाहेरील काम करणाऱ्या कामगारांसाठी नवीन नियमावली लागू केली आहे.

Maharashtra Heat Wave SOP: उन्हाच्या तडाख्यामुळे सरकारने बदलली कामाची वेळ; तुमच्या कामाचे वेळापत्रक काय आहे पाहा?

मुंबई: उन्हाळ्याच्या तीव्रतेत सातत्याने वाढ होत असताना सरकारने हीटवेव्हशी सामना करण्यासाठी नवीन मानक कार्यपद्धती जाहीर केली आहे. या नव्या नियमांनुसार बाहेरील भागात काम करणाऱ्या कामगारांच्या कामाच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला असून हायड्रेशन ब्रेक अनिवार्य करण्यात आले आहेत.

सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आता बांधकाम, लॉजिस्टिक्स आणि इतर बाहेरील कामांमध्ये गुंतलेल्या कामगारांना सकाळी लवकर आणि संध्याकाळच्या वेळेत काम करावे लागणार आहे. दुपारच्या कडक उन्हाच्या वेळेत काम बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नवीन नियमांनुसार कामगारांची कामाची वेळ सकाळी 6 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 8 अशी निश्चित करण्यात आली आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत काम पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. दिवसातील हा सर्वाधिक उष्ण काळ असल्याने उष्माघात आणि शरीरातील पाण्याची कमतरता होण्याचा धोका जास्त असतो.

सरकारने सर्व कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे बंधनकारक केले आहे. तसेच ORS, इलेक्ट्रोलाइट्स, नियमित पाणी पिण्याचे ब्रेक आणि सावलीत विश्रांती घेण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासनाला कामगारांसाठी कूलिंग झोन आणि तात्पुरत्या शेड्स उभारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे नियम बांधकाम, पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स, स्वच्छता सेवा, वाहतूक नियंत्रण आणि रस्त्यावर व्यवसाय करणारे विक्रेते अशा सर्व क्षेत्रांवर लागू होणार आहेत.

हेही वाचा: Deepika Padukone Pregnant Again : दीपिका आणि रणवीर पुन्हा होणार आई-बाबा; सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत दिली गोड बातमी

महिला कामगार आणि संवेदनशील गटांसाठीही विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. सकाळी आणि संध्याकाळी काम करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षित वाहतूक, पुरेशी प्रकाशयोजना आणि सुरक्षित कार्यस्थळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, उष्णतेच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सरकारी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. उष्माघाताच्या रुग्णांसाठी विशेष उपचार व्यवस्था करण्यात आली असून रुग्णवाहिका सेवाही अधिक सक्षम करण्यात आल्या आहेत.

मुंबई मध्ये लागू करण्यात आलेले हे नवीन वेळापत्रक बदलत्या हवामान आणि वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यामुळे कामगारांची सुरक्षा वाढेलच, पण भविष्यात कामकाजाच्या पद्धतीतही मोठे बदल दिसू शकतात.

हेही वाचा: Abhishek Sharma: अभिषेक शर्माचा नादच खुळा; चेन्नईच्या गोलंदाजांना तावातावाने धुतले; अवघ्या 15 चेंडूत ऐतिहासिक अर्धशतक

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number