भीमा कोरेगाव दंगलप्रकरणानंतर आरोप झालेल्या संभाजी भिडे गुरूजींवर सरकार मेहेरबान असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी केला आहे.
संभाजी भिडे आणि त्यांच्या साथीदारांवरील दंगलीचे 6 गुन्हे सरकारनं मागे घेतल्याचं माहिती अधिकारातून समोर आल्याचा दावा शेख यांनी केला आहे.
7 जून 2017 ते 14 सप्टेंबर 2018 पर्यंत सरकार तर्फे संभाजी भिडे आणि इतर काही नेत्यांवर दाखल अनेक गंभीर गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना सरकारनं दिलेल्या माहितीमधून हे उघड झालं आहे.
जून 2017 पासून 14 सप्टेंबर 2018 पर्यंत 8 शासन निर्णय आणून एकूण 41 दाखल गुन्ह्यांमध्ये हजारोंच्या संख्येत आरोपींवरचे गुन्हे मागे घेण्यात आले आहेत, त्यातही संभाजी भिडेंव्यतिरिक्त भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात आले आहेत.