अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार

राज्यातील अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश कशा पद्धतीने होणार याबाबत संभ्रम असताना शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. अकरावी प्रवेशासाठी होणारी परीक्षा ही पूर्णपणे ऐच्छिक असणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे […]

अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार

राज्यातील अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश कशा पद्धतीने होणार याबाबत संभ्रम असताना शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे.

अकरावी प्रवेशासाठी होणारी परीक्षा ही पूर्णपणे ऐच्छिक असणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे अकरावीचे प्रवेश कशा पद्धतीने होणारअसा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी सीईटीचा निर्णय घेण्यात आला आहे.

२०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी दहावीच्या परीक्षेचा अर्ज भरलेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरलेले असल्याने त्यांना सीईटी परीक्षाशुल्क भरावे लागणार नाही. परंतु, सीबीएसई, आयसीएसई आणि इतर आंतरराष्ट्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाकडून निश्चित केलेले शुल्क भरावे लागणार आहे.

या परीक्षेमध्ये १०० गुणांचे बहुपर्यायी प्रश्न असतील. यामध्ये इंग्रजी,गणित,विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत. तसेच ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

तसेच राज्यातील दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू असून अंतिम निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर करण्यात येईल, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number