अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी ६ कोटी! ‘हे आहे ठाकरे सरकारचे महाराष्ट्र मॉडेल’

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियासाठी महाविकास आघाडी सरकार सहा कोटी खर्च करणार आहे. यासाठी बाहेरील एजन्सीवर याची जबाबदारी सोपवण्यात येणार असून यासंबंधीचा अधिकृत आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. अजित पवारांचं सचिवालय , माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयसोबत चर्चा करून एजन्सीची निवड केली जाणार आहे. दरम्यान एकीकडे राज्य आर्थिक संकटात असताना अजित […]

अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी ६ कोटी! ‘हे आहे ठाकरे सरकारचे महाराष्ट्र मॉडेल’

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियासाठी महाविकास आघाडी सरकार सहा कोटी खर्च करणार आहे. यासाठी बाहेरील एजन्सीवर याची जबाबदारी सोपवण्यात येणार असून यासंबंधीचा अधिकृत आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. अजित पवारांचं सचिवालय , माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयसोबत चर्चा करून एजन्सीची निवड केली जाणार आहे. दरम्यान एकीकडे राज्य आर्थिक संकटात असताना अजित पवारांच्या सोशल मीडियावर इतका खर्च करण्यावरुन राज्यात अनेकांकडून करण्यात येत आहे.

‘हे आहे ठाकरे सरकारचे महाराष्ट्र मॉडेल’

भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरला व्हिडीओ ट्विट करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी सरकारी पैशांवर नेमलेल्या पीआर एजंसी तात्काळ रद्द करत चौकशी करण्याची मागणी केली आहे. ‘लसीकरण महत्वाचे नाही आणि लोकांचे जीवनही! मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे सोशल मीडिया नाही चालले तर, त्यांचा पीआर झाला नाही तर महाराष्ट्राची जनता जगेल कशी? कोरोना हटेल कसा? म्हणून त्यावर फक्त काही कोटी रुपयांचा खर्च. हे आहे ठाकरे सरकारचे महाराष्ट्र मॉडेल’, अशी टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.

‘यांचे काका आजारपणातून बाहेर आल्यानंतर शेतकरी आणि मराठा आरक्षणाची चिंता नाही, त्यांना बार मालकांची चिंता.जनता, डॉक्टर, नर्सेस पैसे आणि पगाराविना तडफडत आहेत. लोक कोरोनामुळे मरत असतानादेखील या निर्लज्ज आणि बेशरम सरकारला आपल्या प्रसिद्धीची चिंता आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी सरकारी पैशांवर नेमलेल्या पीआर एजंसी तात्काळ रद्द करा आणि याची पूर्ण चौकशी करा’, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number