अखेर शेतकऱ्यांचा संप मागे, मध्यरात्री चार तास बैठक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई     शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव मिळावा आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेला संप आज मध्यरात्री अखेर मागे घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शेतकरी संघटनेचे नेते यांच्यात तब्बल ४ तास झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात येत असल्याची घोषणा शेतकरी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केली.   शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या मान्य झाल्याचा दावा या […]

अखेर शेतकऱ्यांचा संप मागे, मध्यरात्री चार तास बैठक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई  

 

शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव मिळावा आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेला संप आज मध्यरात्री अखेर मागे घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शेतकरी संघटनेचे नेते यांच्यात तब्बल ४ तास झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात येत असल्याची घोषणा शेतकरी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केली.

 

शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या मान्य झाल्याचा दावा या बैठकीनंतर कऱण्यात आला.

 

अल्पभूधारक थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफी देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. या बैठकीसाठी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

रात्री साडेबाराच्या सुमारास सुरु झालेली बैठक पहाटे पावणे चारच्या सुमारास संपली आणि शेतकऱ्यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली.

 

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा,   शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा आणि  शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी, अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी 1 जूनपासून संपाची हाक दिली होती. त्याला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळाला होता.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number