Maharashtra Farmer Loan Waiver Scheme: आजपासून 16.94 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 7 हजार कोटी; 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र

पहिल्याच टप्प्यात सुमारे 16.94 लाख शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात तब्बल 7 हजार कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Maharashtra Farmer Loan Waiver Scheme: आजपासून 16.94 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 7 हजार कोटी; 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र

राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीला आता वेग आला असून, पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात उद्यापासून (४ ऑगस्ट) कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. पहिल्याच टप्प्यात सुमारे 16.94 लाख शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात तब्बल 7 हजार कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मात्र, योजनेच्या छाननी प्रक्रियेदरम्यान सुमारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरले आहेत. शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार प्राप्तिकर (Income Tax) भरणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही.

हेही वाचा – BMC Students Educational Trip: बीएमसीची शैक्षणिक सहल वादाच्या भोवऱ्यात; ८७ लाखांच्या कंत्राटावर प्रश्नचिन्ह

सरकारकडून एकाच वेळी 7 हजार कोटी रुपयांचा निधी संबंधित बँकांमार्फत शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात वर्ग केला जाणार आहे. यामुळे पात्र शेतकऱ्यांची थकीत कर्जे कमी होतील आणि त्यांना पुन्हा नव्याने पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होईल. आगामी शेती हंगामासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत सुमारे 10 लाख शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनीही लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून, नव्या पीक कर्जासाठी त्यांना बँकांकडून कर्ज मिळण्याचा मार्गही सुकर होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number