Maharashtra Earthquake: महाराष्ट्रात खळबळ! नाशिक-पालघरमध्ये भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

महाराष्ट्रातील नाशिक आणि पालघर जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Maharashtra Earthquake: महाराष्ट्रात खळबळ! नाशिक-पालघरमध्ये भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई : महाराष्ट्रातील नाशिक आणि पालघर जिल्ह्यांमध्ये शनिवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही जिल्ह्यांतील अनेक भागांमध्ये धरणीकंपाची तीव्रता कमी असली तरी सलग जाणवलेल्या धक्क्यांमुळे नागरिकांनी सुरक्षिततेसाठी घराबाहेर धाव घेतली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

पालघर जिल्ह्यातील कासा आणि धुंदलवाडी परिसरात सकाळी सुमारे 10.58 वाजण्याच्या दरम्यान भूकंपाचा धक्का जाणवला. स्थानिकांनी काही क्षण जमिनीला कंप जाणवल्याचे सांगितले. या भागात गेल्या काही वर्षांपासून अधूनमधून सौम्य भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांना शांत राहण्याचे आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.

दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातही भूकंपाचे सलग चार धक्के जाणवल्याने परिसरात खळबळ उडाली. सराड, घागबारी आणि बोरगाव या गावांमध्ये सकाळी 9.55 ते 10.01 या अल्प कालावधीत धरणीकंपाचे सौम्य हादरे बसल्याची नोंद झाली. काही नागरिक त्या वेळी घरात होते, तर अनेकजण शेतीच्या कामासाठी बाहेर गेले होते. अचानक जमिनीला कंप जाणवताच अनेकांनी सुरक्षिततेसाठी घराबाहेर धाव घेतली.

हेही वाचा: TET Exam Paper Leak Update : भिवंडी पोलिसांची थरारक कारवाई; महिन्याभराच्या प्रयत्नांनंतर पाटणा येथून मुख्य आरोपी अटकेत

सततच्या धक्क्यांमुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी माहिती संकलित करून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले. प्राथमिक तपासणीत कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे समोर आलेले नाही.

तज्ज्ञांच्या मते, कमी तीव्रतेचे भूकंप अनेकदा मोठे नुकसान करत नाहीत. मात्र, सलग धक्के जाणवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित ठिकाणी जाणे, इमारतींपासून दूर राहणे आणि अधिकृत प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. सोशल मीडियावरील अप्रमाणित माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: Neet Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य संशयिताला सीबीआयकडून क्लिन चीट; तपासाला नवे वळण

दरम्यान, पालघर आणि नाशिक जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. भूकंपाच्या नोंदी आणि त्यानंतरच्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून नागरिकांनी कोणतीही संशयास्पद किंवा आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास स्थानिक प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number