जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
देशात आणि राज्यात भ्रष्टाचाराविरोधात कितीही मोहिमा राबवल्या तरी भ्रष्टाचार संपण्याचं नाव घेत नाही.
नुकत्याच सेंटर फॉर मीडिया स्टडिज या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये भ्रष्टाचारात महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर असल्याचं आढळून आले.
तर, सर्वाधिक भ्रष्टाचार हा कर्नाटकामध्ये होत असल्याचं आढळून आले.
सर्वात कमी भ्रष्टाचार हा केरळमध्ये होत असल्याचं समोर आले.
देशातील 20 राज्यातून 3 हजार लोकांशी बोलून हे सर्वेक्षण करण्यात आलंय. कर्नाटकातील 77 टक्के लोकांनी सरकारी पातळीवर भ्रष्टाचार होत असल्याचं म्हटलं आहे.
त्याच्यानंतर आंध्रप्रदेशातील 74 टक्के, तामिळनाडू 68 टक्के, महाराष्ट्रातील 57 टक्के, जम्मू काश्मिरमधील 44 टक्के, पंजाबमधील 42 टक्के लोकांना सरकारी कामे करुन घेताना
भ्रष्ट्राचार होत असल्याचं आढळून आल्याचं म्हटले.