‘वाघ आमच्याच इशा-यावर चालतो’; मंत्री विजय वडेट्टीवार यांचा सरकारला घरचा आहेर

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपण ओबीसी असल्यानंच महसूल खातं आपल्याला मिळालं नसल्याचा घणाघाती आरोप केला आहे. ‘महाराष्ट्रात ३ दिवस फिरलो, तरी २५ लाखांची सभा होईल. मला ओबीसीचं खातं मिळालं, तेव्हा चपरासी देखील नव्हता. मी उधारीवर हे खातं चालवतो. समाज कल्याणच्या भरवशावर ओबीसी खातं चालवतोय. ओबीसी खात्यात जागा भरण्यासाठी पैसे नाही म्हणतात,कार्यालयालाही […]

‘वाघ आमच्याच इशा-यावर चालतो’; मंत्री विजय वडेट्टीवार यांचा सरकारला घरचा आहेर

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपण ओबीसी असल्यानंच महसूल खातं आपल्याला मिळालं नसल्याचा घणाघाती आरोप केला आहे. ‘महाराष्ट्रात ३ दिवस फिरलो, तरी २५ लाखांची सभा होईल. मला ओबीसीचं खातं मिळालं, तेव्हा चपरासी देखील नव्हता. मी उधारीवर हे खातं चालवतो. समाज कल्याणच्या भरवशावर ओबीसी खातं चालवतोय. ओबीसी खात्यात जागा भरण्यासाठी पैसे नाही म्हणतात,कार्यालयालाही जागा नाही’, असं म्हणत वडेट्टीवार यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

‘वाघ आमच्याच इशा-यावर चालतो’, असं खळबळजनक वक्तव्य करत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेला कोपरखळी दिली. तर सावरून घेताना ‘वाघ आमचाच आहे’, अशी पुष्टी जोडायलाही वडेट्टीवार विसरले नाहीत.

विजय वडेट्टीवार यांनी कोरोना काळात निवडणूक घेण्यावरुन निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच या निवडणुकांमुळे कोरोना वाढला तर याला निवडणूक आयोगाला जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. याशिवाय त्यांनी राज्य सरकार निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्यासाठी मनुष्यबळ देणार नसल्याचंही सांगितलं आहे. या विरोधात निवडणूक आयोगाला काय करायचं ते करावं, असंदेखील वडेट्टीवार म्हणाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number