Maharashtra Weather Update: राज्यात अशी थंडीची लाट आत्तापर्यंत कधीच आली नसेल, पुढील 72 तास महत्वाचे!

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात थंडी वाढणार असून काही ठिकाणी तापमान 6°C ने खाली येऊ शकते. 22 नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता कायम आहे.

Maharashtra Weather Update: राज्यात अशी थंडीची लाट आत्तापर्यंत कधीच आली नसेल, पुढील 72 तास महत्वाचे!

मुंबई: थंडीने राज्यभर थैमान घालण्याची तयारी केली आहे! हवामान विभागाने कडाक्याच्या थंडीचा इशारा देत पुढील काही दिवस महाराष्ट्रातील तापमान अचानक खाली उतरणार असल्याचे सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 18 ते 19 नोव्हेंबरदरम्यान देशाच्या उत्तरेकडील राज्यांत मोठी आणि धोक्याची थंडीची लाट धडकणार असून, त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे.

उत्तरेकडून येणारे थंड वारे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांमध्ये तापमान जलदगतीने खाली आणतील. 20-21 नोव्हेंबरला हीच स्थिती राहणार असल्याचे संकेत आहेत. दक्षिण भारतातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 22 नोव्हेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे, मागील 24 तासांत विदर्भातील अनेक भागांत थंडीने विदर्भ गारठून गेला असून, राज्यातील तापमानात आणखी 4 ते 6 डिग्री सेल्सियसची घसरण अपेक्षित आहे. कोकण वगळता महाराष्ट्रातील बहुतेक भागांमध्ये पुढील चार दिवस कडाक्याची थंडी जाणवणार आहे.

हेही वाचा: Digital Arrest: डिजिटल अरेस्टच्या नावाने देशभरात वाढणाऱ्या फसवणुकीवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक धोरणात्मक इशारा

काही जिल्ह्यांत तापमान 6 डिग्रीपेक्षा जास्त खाली जाण्याचीही भीती आहे. त्यामुळे “कामे सोडून शेकोटी समोरच बसावे काय?" अश्या विनोदी चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे. विदर्भात विशेषतः नागपूरमध्ये निरभ्र आकाश राहण्याचा अंदाज असून, कमाल तापमान सुमारे 27  डिग्री सेल्सियस आणि किमान तापमान 12 डिग्री सेल्सियस पर्यंत खाली उतरण्याची शक्यता आहे. गोंदिया, भंडारा आणि इतर जिल्ह्यांमध्ये सकाळ आणि रात्रीच्या वेळी गारवा अधिक तीव्र होईल. महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांसाठी 18 नोव्हेंबर रोजी शीतलहरींचा इशारा देत येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. धुळे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी उबदार कपडे वापरावेत, थंडीत अनावश्यक बाहेर जाणे टाळावे आणि आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, असे हवामान विभागाचे सांगणे आहे. हवामान तज्ज्ञांनुसार, यावर्षीची थंडी फेब्रुवारीपर्यंत कायम राहू शकते, आणि मागील वर्षाच्या तुलनेत विशेषतः मुंबईसह राज्यात यंदा थंडीचा जोर जास्त जाणवेल. याचवेळी, पश्चिम बंगालच्या खाडीत नवीन कमी दाबाचा पट्टा तयार होत असून 22 तारखेपासून पुन्हा पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यभरात वाढणारी थंडी, सतत बदलणारे वातावरण आणि पावसाची शक्यता पाहता प्रशासनांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा:  Sharmila Thackeray On Amit Thackeray : "हा विचार मराठी माणसाने केला पाहिजे" अमित ठाकरेंवरील गुन्ह्यावर शर्मिला ठाकरेंची पडखर प्रतिक्रिया

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number