क्राइम ब्रांचमधून सचिन वाझे यांची बदली

मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरुन सध्या विरोधक आक्रमक झाले आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची बदली करणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी सचिन वाझे यांची क्राइम ब्रांचमधून बदली करुन इतर ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र या मुद्दावर विरोधक सचिन वाझे यांच्या अटकेची […]

क्राइम ब्रांचमधून सचिन वाझे यांची बदली

मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरुन सध्या विरोधक आक्रमक झाले आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची बदली करणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी सचिन वाझे यांची क्राइम ब्रांचमधून बदली करुन इतर ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र या मुद्दावर विरोधक सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी करत आहे. सभागृहात झालेल्या गदारोळानंतर कारवाई स्थगित करण्यात आली असून
अनिल देशमुख यांनी निवदेनाच्या सुरुवातीला राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी दिली. मात्र यावरुन विरोधकांनी गदारोळ घालत सचिन वाझेंवर काय कारवाई करा अशी मागणी केली.

 

अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं की, “सचिन वाझेंवर नियमानुसार कारवाई होईल. सध्या क्राइम ब्रांच जिथे ते कामाला आहेत तिथून हलवून दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल”. निष्पक्षपणे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारावई करण्यात येईल असंही यावेळी त्यांनी सांगितलं. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंची बदली होणार असल्याची घोषणा केल्यानंतरही विरोधकांचा गदारोळ कायम होता. बदली नाही तर निलंबन करा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणावर अनेक राजकीय नेते आक्रमक झाले असून प्रवीण दरेकर संतापले. शिवाय त्यांनी “कोण लागून गेला सचिन वाझे?,” “सचिन वाझे प्रकरणावरुन वातावरण अत्यंत संतप्त आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझेंनी पतीचा खून केल्याचा संशय व्यक्त केल आहे. प्रथमदर्शनी अनेक पुरावे समोर येत आहेत. विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी पत्नीचा जबाब सांगितला तरी सरकार सचिन वाझेंना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहे,” असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

“पूजा चव्हाण प्रकरणात २० दिवस एफआयआर दाखल झाला नाही. लॅपटॉपवरील पुरावे गायब झाले शिवाय अरुण राठोड गायब आहे, रुग्णलयात गर्भपात करणारी पूजा अरुण राठोड कोण हे अजून समोर आलेलं नाही,” असा उल्लेख करत प्रवीण दरेकर यांनी कायदा-सुव्यस्थेवरुन सरकारवर टीका केली आहे.

“मनसुख हिरेन प्रकरणात ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या नष्ट करण्यासाठी सरकार संधी देत आहे. राज्यातील जनतेचा सरकावर विश्वास राहिलेला नाही. कोण लागून गेला सचिन वाझे? तुमचा जावईल आहे का सभापती महोदय? का हे सरकार पाठीशी घालत आहे?,” असे संतप्त सवाल प्रवीण दरेकर यांनी विचारले. पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ दिला जात आहे असा आरोप करताना सचिन वाझेंना अटक करण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. या प्रकरणी सभागृहात गदारोळ झाला असून या प्रकरणावर चौकशी सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number