Maharashtra Board: दहावी-बारावीच्या परीक्षा पद्धतीत मोठी क्रांती! आता पेपर तपासणार AI, विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनात होणार मोठे बदल

दहावी-बारावीच्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल होणार असून, उत्तरपत्रिका तपासण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. परीक्षा मंडळाने यासाठी तीन विशेष समित्या स्थापन केल्या आहेत.

Maharashtra Board: दहावी-बारावीच्या परीक्षा पद्धतीत मोठी क्रांती! आता पेपर तपासणार AI, विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनात होणार मोठे बदल

राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये येत्या काही वर्षांत मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा आणि मूल्यमापन पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला निर्णय म्हणजे उत्तरपत्रिका तपासणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर.

विद्यार्थ्यांचे मूल्यमापन अधिक पारदर्शक, अचूक आणि जलद पद्धतीने करण्याच्या उद्देशाने परीक्षा मंडळाने तीन विशेष समित्यांची स्थापना केली आहे. या समित्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार परीक्षा पद्धतीत आवश्यक बदल सुचवणार आहेत.

हेही वाचा: Indian Railway Refund Rules: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! प्रवास पूर्ण झाल्यावरही मिळू शकतो तिकीटाचा रिफंड; रेल्वेचा 'हा' नियम तुम्हाला माहिती आहे का?

सध्या राज्यात शालेय शिक्षणामध्ये टप्प्याटप्प्याने बदल करण्यात येत आहेत. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचा सुधारित अभ्यासक्रम यापूर्वीच लागू करण्यात आला आहे. चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता सहावीचा नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला असून, पुढील शैक्षणिक वर्षात पाचवी, सातवी, नववी आणि अकरावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. त्यानंतरच्या वर्षात आठवी, दहावी आणि बारावीचा नवीन अभ्यासक्रम लागू करण्याची योजना आहे.

या बदलांमुळे परीक्षा पद्धतीतही सुधारणा आवश्यक असल्याचे शिक्षण विभागाचे मत आहे. यासाठी विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करण्यासोबतच मूल्यमापन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे.

एआयच्या मदतीने उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन अधिक वेगाने होऊ शकणार आहे. यामुळे निकाल प्रक्रियेलाही गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच मानवी त्रुटी कमी करून विद्यार्थ्यांना अधिक अचूक गुणांकन मिळेल, असा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा: Farmer Loan Waiver: बळीराजासाठी खुशखबर! 'या' तारखेपासून खात्यात जमा होणार कर्जमाफीचे पैसे; सरकारची मोठी घोषणा

याशिवाय, परीक्षा वेळेत घेण्यासाठी आणि निकाल लवकर जाहीर करण्यासाठीही विविध उपाययोजनांचा विचार सुरू आहे. परीक्षेचा कालावधी कमी करणे, प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपात बदल करणे आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्याधारित मूल्यमापनावर अधिक भर देणे यासारख्या बाबींवर समित्या काम करणार आहेत.

परीक्षा मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे सर्वांगीण मूल्यमापन हे नवीन शैक्षणिक धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतींसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन अधिक प्रभावी मूल्यमापन प्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांसाठी ही मोठी बातमी मानली जात असून, आगामी काळात शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number