आप्पासाहेब धर्माधिकारींना ‘महाराष्ट्र भूषण’

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने देशाला तीन मोठे विचार दिले. स्वराज्य, भक्ति आणि शिक्षणाचा विचार राज्याने संपूर्ण देशाला दिला आहे. आता आपासाहेब धर्माधिकारी हे तिन्ही विचार त्यांच्या माध्यमांतून पुढे नेत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य शासनाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या […]

आप्पासाहेब धर्माधिकारींना ‘महाराष्ट्र भूषण’

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने देशाला तीन मोठे विचार दिले. स्वराज्य, भक्ति आणि शिक्षणाचा विचार राज्याने संपूर्ण देशाला दिला आहे. आता आपासाहेब धर्माधिकारी हे तिन्ही विचार त्यांच्या माध्यमांतून पुढे नेत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य शासनाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुंनगंटीवार उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शहा बोलत होते.

शहा म्हणाले, शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचा विचार जपत देशाला पारतंत्रयातून मुक्त करण्यासाठी लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके यांनी लढा दिला. दूसरा भक्तीचा विचार महाराष्ट्राने भारताला दिला तो भक्तीचा. संत तुकाराम महाराज ते रामदास स्वामी यांनी भक्ती मार्ग दाखवत समाजाची खऱ्या अर्थाने सेवा केली आहे. त्यांचे कार्य संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा वारसा देशाला दिला आणि आता आपासाहेब धर्माधिकारी हे तिन्ही विचार त्यांच्या माध्यमांतून पुढे नेत आहेत.

नानासाहेब धर्माधिकारी यांनी रुजवलेल्या रोपट्याचं वटवृक्ष करण्याचं कार्य आप्पासाहेबांनी केलं आहे. त्यांचं हेच कार्य त्यांचे चिरंजीव सचिनदादा धर्माधिकारी करत आहेत. दासबोधावरील श्रवण बैठका महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात होत आहेतच, शिवाय देशातील सर्व राज्ये आणि जगातील बहुतांश देशात हे कार्य सुरू आहे. अध्यात्म क्षेत्रात कार्यरत असतानाच सामाजिक कार्यात त्यांचा मोठा वाटा आहे.आप्पासाहेब धर्माधिकारींना ‘महाराष्ट्र भूषण’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number