राज्यात शनिवारी ९ हजार ८१२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र कोरोनाच्या डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटचं संकट आरोग्य यंत्रणांसमोर उभं राहिलं आहे. राज्यात शनिवारी एकूण ९ हजार ८१२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात शनिवारी ८ हजार ७५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे आजपर्यंत महाराष्ट्रात बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ५७ लाख ८१ हजार ५५१ इतका झाला आहे. […]

राज्यात शनिवारी ९ हजार ८१२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र कोरोनाच्या डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटचं संकट आरोग्य यंत्रणांसमोर उभं राहिलं आहे. राज्यात शनिवारी एकूण ९ हजार ८१२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.

राज्यात शनिवारी ८ हजार ७५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे आजपर्यंत महाराष्ट्रात बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ५७ लाख ८१ हजार ५५१ इतका झाला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९३ टक्के इतके झाले आहे.

तसेच शनिवारी १७९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.० टक्के आहे.

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले असून सर्व जिल्हे आता तिसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहेत. त्यामुळे आता दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंतच खुली राहणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number