Mahapalika Election 2026 : मोठी घोषणा! 15 जानेवारीला सुट्टी जाहीर, जाणून घ्या सविस्तर

5 जानेवारी मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे.

Mahapalika Election 2026 : मोठी घोषणा! 15 जानेवारीला सुट्टी जाहीर, जाणून घ्या सविस्तर

राज्यभरात निवडणूकांची धामधूम  सुरू आहे. तसेच आता राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून बडे नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. दुसरीकडे कार्यकर्ते आणि नागरिकांनाही प्रचारसंभांची उत्सुकता लागली आहे. 

राज्य सरकारनेही 15 जानेवारी मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. मुंबईसह राज्यातील 29 महापालिका क्षेत्रात मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे, कामगार, कर्मचारी आणि शासकीय व निमशासकीय ठिकाणी काम करणाऱ्यांना मतदानादिवशी सुट्टी असून मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय.

सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या महानगरपालिकांमध्ये बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number